शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नाल्यांवरील चार इमारतींवर कारवाई

By admin | Published: May 10, 2016 12:43 AM

औरंगाबाद : औषधी भवनसह चार इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. नाल्यावर व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येतील

औरंगाबाद : औषधी भवनसह चार इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. नाल्यावर व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येतील. औषधी भवन इमारतीच्या कराराचे नूतनीकरण भविष्यात अजिबात करण्यात येणार नाही, असा इशारा मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिला आहे. बकोरिया म्हणाले की, औषधी भवनच्या इमारतीसंदर्भात आज एका शिष्टमंडळाने आपली भेट घेतली. नागरिकांना दरवर्षी त्रास होत असेल तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असे मी त्यांना सांगितले आहे. औषधी भवनसह पीपल्स बँक, श्रीमान-श्रीमती, मराठा सेवा संघ या चार इमारतींवरदेखील कारवाई करावी लागेल. पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देणे एवढाच आमचा उद्देश आहे. औषधी भवनच्या कराराची फाईल तपासण्यात येत असून कराराचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. शहरात परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक प्रवाह मोकळा करणे गरजेचा आहे. नाल्यावरच्या व नाल्याच्या काठावर असलेल्या इमारतींची बांधकाम परवानगी तपासण्यात येणार आहे. या कामासाठी थोडा वेळ लागेल. टीडीआर घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार सुटीवर असून, ते परत आल्यानंतर या प्रकरणी चर्चा करण्यात येणार आहे.