शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

विद्यापीठाचा ८० टक्के महाविद्यालयांना दणका; ३७२ महाविद्यालयांतील प्रवेश पूर्णतः थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2023 3:08 PM

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ४७१ महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशासाठी मान्य जागांसह (इनटेक कॅपॅसिटी) यादी ३१ मे रोजी सायंकाळी प्रसिद्ध झाली. पूर्णवेळ प्राचार्य, कुशल मनुष्यबळ व पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून, काही कोर्सेसची क्षमता घटविण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. याचा दणका ८० टक्के महाविद्यालयांना बसला आहे.

शैक्षणिक वर्षात २०२३- २४ यासाठीची संलग्नित ४७१ महाविद्यालयांची यादी बुधवारी घोषित करण्यात आली. या यादीनुसार महाविद्यालयात एकूण १९०० पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सध्या सुरू आहेत. यापैकी ३७२ महाविद्यालयांच्या ३९३ अभ्यासक्रमांचे प्रवेश पूर्णतः थांबविण्यात आले आहेत, तर ५३४ अभ्यासक्रमांचे प्रवेश घटविण्यात आले आहेत, तसेच १९०० पैकी ९७३ अभ्यासक्रमांनाच पूर्ण क्षमतेने प्रवेश देता येणार आहेत.

यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शैक्षणिक विभागाच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, संबंधित महाविद्यालयामध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा नॅक मूल्यांकन, शैक्षणिक अंकेक्षण, अध्यापक नियुक्ती व इतर तत्सम बाबींच्या आधारे २०२३- २४ साठी तात्पुरती संलग्नता यादी तयार करण्यात आली असून, सदरील यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. सर्व संबंधित महाविद्यालयांनी संबंधित यादीचे अवलोकन करून या तात्पुरत्या यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास ५ जूनपर्यंत आवश्यक त्या दस्तावेजासह लेखी स्वरूपात त्रुटी आक्षेप अर्ज विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागामध्ये सादर करावेत, अशी माहिती प्रकुलगुरू डॉ. श्याम सिरसाठ यांनी दिली.

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास कारवाईक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी म्हटले आहे. राज्य शासनाकडून मान्यता मिळविताना या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे शपथपत्र संस्थाचालकांच्या वतीने देण्यात येत असते. शैक्षणिक गुणवत्ता जोपासण्याची नैतिक जबाबदारी विद्यापीठ व महाविद्यालयांवर असून, या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण