औरंगाबाद : ‘दलित’ शब्द उच्चारल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा दलित नाही, बौद्ध म्हणा अभियानातर्फे एका पत्रपरिषदेत अनिलकुमार सोनकामळे यांनी दिला आहे.त्यांनी सांगितले की, आंबेडकरी समाजाची असंवैधानिक, अपमानकारक व गुलामगिरीची अवस्था दर्शविणाऱ्या दलित शब्दाची ओळख नष्ट करून सन्मानजनक व स्वाभिमानी ओळख निर्माण करण्यासाठी दलित नाही, बौद्ध म्हणा अभियान सुरूआहे. आगामी निवडणुकांत, शासकीय कामकाजात आणि नेते मंडळींनी तसा शब्द वापरल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते. गेल्या साडेतीन वर्षांपासून हे अभियान सुरू आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गात आत्मसन्मान जागृत होत आहे. न्यायालयाने दलित शब्द वापरूनये असे स्पष्ट केले आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी तसा वापर होतो, त्यामुळे आगामी काळात हे अभियान व्यापक करण्यात येणार आहे.निवडणुकीच्या काळात या शब्दाचा वापर सर्रास होतो. तो होऊ नये यासाठी निवडणूक अधिकाºयांना व पोलीस अधिकाºयांनाही पत्रे देण्यात आली आहेत, असे सोनकामळे यांनी सांगितले. पत्रपरिषदेस मुुकुंद सोनवणे, भंते सुदत्त, संजय बन्सवाल, संजय चिकसे, के. एम. देवळे, दिनकर नवगिरे, सुधाकर घोरपडे, पुष्पा घोडके, प्रदीप बावस्कर, वसंत गाडे आदींची उपस्थिती होती.
‘ दलित’ शब्द उच्चारल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 11:10 PM
‘दलित’ शब्द उच्चारल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होऊ शकते, असा इशारा दलित नाही, बौद्ध म्हणा अभियानातर्फे एका पत्रपरिषदेत अनिलकुमार सोनकामळे यांनी दिला आहे.
ठळक मुद्देदलित नाही बौद्ध म्हणा अभियानातर्फे इशारा