शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

वस्ती सुधार योजनेसाठी ५५.६२ कोटींचा कृती आराखडा मंजूर

By admin | Published: November 14, 2015 12:30 AM

.. लातूर : अनुसूचित जाती तसेच नवबौद्धांच्या वस्ती विकासाचा ५५.६२ कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, कृती आराखड्यातील वस्त्यांची निवड करण्यात आली आहे.

..लातूर : अनुसूचित जाती तसेच नवबौद्धांच्या वस्ती विकासाचा ५५.६२ कोटींचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, कृती आराखड्यातील वस्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील २६२६ वस्त्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत या बृहत् आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार २१५-१६ या वर्षात या वस्त्यांच्या विकासासाठी ५५.६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वस्ती निवड करण्याबाबत समिती गठित करण्यात आली होती. परंतु, ही समिती मे २०१५ अन्वये रद्द करण्यात आली असून, दलित वस्तीची कामे जिल्हा परिषदेमार्फत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृती आराखड्यातील दलित वस्त्यांची निवड करून त्यास प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. तालुकानिहाय वस्त्यांची निवड करून शासनाकडून प्राप्त निधीच्या अधीन राहून या वस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. बृहत् आराखड्यानुसार जिल्ह्यात अशा २६२६ वस्त्या आहेत. त्यात लातूर तालुक्यात ४१७, अहमदपूर तालुक्यात २७७, उदगीर तालुक्यात ३३५, निलंगा तालुक्यात ४३८, औसा तालुक्यात ३६२, चाकूर तालुक्यात २३५, रेणापूर तालुक्यात १२५, देवणी तालुक्यात ११६, शिरूर अनंतपाळ तालुक्यात १२७, जळकोट तालुक्यात १३४ वस्त्यांचा समावेश आहे. या वस्त्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्याबाबतच्या कृती आराखड्यावर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार या वस्त्यांमध्ये आता सिमेंट रस्ते, लाईट, पाण्याची सोय, समाज मंदिर आदी कामे केली जाणार आहेत. दरम्यान, सभागृहात या कृती आराखड्यास मंजुरी देण्याचा ठराव रामचंद्र तिरुके यांनी मांडला होता. या ठरावाला भरत गोरे यांनी अनुमोदन दिले. (प्रतिनिधी)अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध व दलित समाजातील वस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येते. या योजनेचाच हा भाग असून, शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहून या वस्त्यांमध्ये विकासाची विविध कामे होणार असल्याची माहिती जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी दिली. अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्धांच्या वस्त्यांसाठी ५५.६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील काही निधी राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. या निधीतून निवडलेल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, नाल्या, विद्युतीकरण, समाज मंदिरांची दुरुस्ती तसेच विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत.४वर्षभरात २२२६ वस्त्यांमध्ये ही कामे करून दलित वस्त्यांचा विकास साधला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ही कामे पूर्ण होणार आहेत, असे समिती सदस्य सहदेव मस्के यांनी सांगितले.