उस्मानाबाद : खून, दरोड्यासह इतर विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या १२ जणाविरूध्द मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ चालू वर्षी तब्बल २८ जणाविरूध्द मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून, या कारवाईने दरोडेखोर, चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत़कळंब तालुक्यातील चोराखळी पाटीजवळ राष्ट्रीय महामार्गावर चोरट्यांनी ट्रकसमोर (क्ऱटी़एऩ३४- ई ८०७१) जीप अडवी लावून थांबविली होती़ त्यावेळी चालक व क्लिनरला जबर मारहाण करीत दोन्ही हात बांधून ट्रक येरमाळा चौकातून मनुष्यबळ पाटीजवळ नेला होता़ त्यावेळी चालक दिनेशकुमार गणेशायन (वय-२२ राग़र्व्हनर तोफ मंजनी ता़आतूर जि़सेलम तामिळनाडू) व क्लिनर के़पुर्नवसू कन्नन याच्याकडील मोबाईल व रोख १५ हजार रूपये काढून नेण्यात आले़ तसेच त्यांना जीपमध्ये घालून येडेश्वरी मंदिराच्या पाठीमागे नेवून तळ्यातील कोरड्या आडात गणेशायन व क्लिनर कन्नन टाकले होते़ याप्रकरणी गणेशायन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २ मे रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात ट्रकसह ३२४ पोती शाबुदाना, डिझेल असा एकूण १५ लाख, १८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी पाच जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर पोलिसांनी कोरड्या आडात जावून पाहिले असता कन्नन याचा मृतदेह आढळून आला़ पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि माधव गुंडीले यांनी चार पथके तयार करून आरोपींच्या शोधार्थ पाठविले होते़ पथकाने ४ मे रोजी राजा बालाजी पवार (रा़येरमाळा), बबन आबा शिंदे (रा़पिंपळगाव क़), मधुकर बाबू शिंदे (रा़लाखनगाव) यांना ताब्यात घेवून चौकशी केली होती़ त्या माहितीवरून उपळाई पाटीजवळील दिनेश हॉटेलच्या पाठीमागे छापा मारला असता ७० पोती शाबुदाना मिळून आल्याने रामेश्वर आनंत हरभरे व इतरांना ताब्यात घेवून चौकशी केली़ त्यावेळी चोराखळी येथील शाम बलभिम चाचणे यांच्या घरी छापा मारून ६० पोती शाबुदाना व जीप (क्ऱएम़एच़२३-टी़१००७) ही जप्त करून शाम साचणे यास ताब्यात घेण्यात आले होते़ तसेच ८ मे रोजी मसोबाचीवाडी शिवारातील वनक्षेत्रातून ट्रक व १३७ पोती शाबुदाना जप्त करण्यात आला होता़ या प्रकरणी राजा पवार (रा़येरमाळा), बबन शिंदे (रा़पिंपळगाव), मधुकर शिंदे (रा़लाखनगाव), रामेश्वर हारभरे, विनोद हरभरे (दोघे रा़उपळाई), शाम चाचणे, काका उर्फ अशोक पवार, गणेश शिंदे, तानाजी साठे, अजित साठे, करण डोंगरे, संभाजी साठे (सर्व रा़चोराखळी) या १२ जणांना अटक करून जीपसह २६७ पोती शाबुदाना असा १४ लाख, ३४ हजार १११ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता़ त्यामुळे या सर्व आरोपीतांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता़ महानिरीक्षकांकडून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकरणी वरील १२ जणाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली़ (प्रतिनिधी)राजा पवार याच्यावर राज्यात ठिकठिकाणी खुनासह चोरी, दरोडा, घरफोडी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो टोळी करून गुन्हे करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे़
बारा आरोपीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई !
By admin | Published: August 03, 2014 12:47 AM