शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नऊ खंडणीखोरांविरूद्ध मोक्काअंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:04 AM

नांदेड : व्यावसायिकांना खंडणी मागून जनमाणसात दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांविरूद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : व्यावसायिकांना खंडणी मागून जनमाणसात दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांविरूद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़ जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून सलग दोन खून करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीने शहरातील तरुणांना प्रोत्साहित करून गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी टोळी निर्माण केली़ या टोळीच्या मदतीने शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिकांना फोनवर धमकावून तसेच घातक शस्त्रांचा धाक दाखवत खंडणीची मागणी केली़ व्यावसायिक खंडणी देत असल्याचे पाहून गुन्हेगारांचे मनोबल वाढले़ परिणामी वारंवार खंडणीची मागणी होत असल्याने काही व्यावसायिकांनी याबाबत पोलिसात तक्रारी दिल्या़ याचा पाठपुरावा पोलिसांनी केला असता खंडणी बहाद्दर टोळीतील सदस्यांविरूद्ध नांदेडसह पंजाब राज्यात सुपारी घेवून खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले़ या टोळीचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील सदस्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत़ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातंर्गत जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंग संधू (वय २३, रा़अबचलनगर, नांदेड), मनप्रितसिंघ उर्फ सोनू सुरजनसिंघ औलख (वय २९, रा़बडपुरा, नांदेड), ईश्वरसिंघ उर्फ लाली मुख्तारसिंघ रंधावा (वय २१, रा़ बडपुरा), रंजितसिंघ उर्फ सोनी सूच्चासिंग चिम्मा (वय ३८, बडपुरा), रंजितसिंघ उर्फ रज्जू करमसिंघ तबेलेवाले (वय ३३, रा़शहीदपुरा), हरविंदरसिंघ उर्फ रिंदा चरणसिंघ संधू, हरजिंदरसिंघ उर्फ आकाश जगजितसिंघ गाडीवाले, सन्नीसिंघ धिल्लो, करमजितसिंघ उर्फ ऋषी मंजितसिंघ भाटीया (वय २७) या ९ जणांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून तपास पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे हे करीत आहेत़ सणासुदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेवून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सक्रीय होतात़ या पार्श्वभूमीवर हिस्ट्री शिटर गुन्हेगारांची माहिती संकलीत करून या काळात त्यांना स्थानबद्ध केले जाते़ वारंवार कारवाई करूनही गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहिल्यास अशा गुन्हेगाराविरूद्ध अभिप्राय मागवून तडीपारीची कारवाई केली जाते़