लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकºयांचा सातबारा कोरा करा या प्रमुख व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे आज राज्यव्यापी रास्ता रोको कार्यक्रमांतर्गत औरंगाबादेतही क्रांती चौकात दुपारी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको करणाºया सुमारे चाळीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. त्यात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.कॉ. मनोहर टाकसाळ, कॉ.एच.एम. देसरडा, कॉ. उद्धव भवलकर, कॉ. बुद्धीनाथ बराळ, कॉ. पंडित मुंडे, कॉ. भगवान भोजने, के. ई. हरिदास, कॉ. सांडू जाधव, कॉ. अभय टाकसाळ, जनार्दन पिंपळे, कॉ. सुनील राठोड या प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे चाळीसहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यावर बसल्याबरोबर अटक केली व गाडीत घालून क्रांतीचौकात आणले. दुपारी तेथे त्यांची सुटका करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनापूर्वी क्रांतीचौकात भाषणे झाली व सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करण्यात आली.अन्य मागण्या अशा : शेतकºयांना पीकविम्यासह मोफत जीवन व आरोग्य विमा लागू करा, शेतकºयांच्या भाकड जनावरांचा सांभाळ सरकारने करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, शेतमालावरील निर्यातबंदी उठावावी, कसणाºयांच्या नावे जमिनी करा, शेतकरी व ग्रामीण कष्टकºयांना सातवा वेतन आयोग लागू करा, शेतकºयांचे संपूर्ण वीज बिल माफ करा व शेतीला मोफत वीज द्या, गरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाºया दारू या अमली पदार्थावर कायद्याने बंदी घाला.शेतकºयांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकºयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या. पोलिसांचा बंदोबस्तही तगडा होता. एकेका कार्यकर्त्याला उचलून पोलिसांनी ताब्यात घेतले. तरीही ते जोरजोराने घोषणा देतच होते.
सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:15 AM