औरंगाबाद : औरंगाबाद येथील डॉ. विजय व्यवहारे आणि माजी राष्ट्रीय सायकलपटू चरणजितसिंग संघ यांनी खडतर असा मार्ग असणारी २०० कि.मी. अंतराची सायकल रायडिंग यशस्वीपणे पूर्ण केली.धुळे सायकलिस्टतर्फे ही सायकल राइड आयोजित करण्यात आली होती. या राइडमध्ये औरंगाबाद जिल्हा सायकल संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय व्यवहारे आणि सचिव चरणजितसिंग संघा यांनी नुकतीच धुळे ते चांदवड अशी २०० कि.मी. अंतर सायकल रायडिंग यशस्वीपणे पूर्ण केली. सायकलिंग करताना त्यांनी ११ कि.मी. खडतर असा घाट, जागोजागी स्पीड ब्रेकर्स त्याचप्रमाणे सकाळी प्रचंड थंडी आणि दुपारी कडक उन्हातही अशा अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करीत ही मोहीम फत्ते केली. विशेष म्हणजे नागरिकांना आरोग्य लाभावे यासाठीदेखील सायकल संघटनेतर्फे विजय व्यवहारे व चरणजितसिंग संघ हे सायकलपटू सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवीत असतात.
औरंगाबादच्या व्यवहारे, संघा यांनी केली २०० कि.मी. सायकल राइड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:49 AM