शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आदर्श बँक घाेटाळा, मानकापे कुटुंबातील तिघे पाचव्यांदा कारागृहातून पाेलिसांच्या ताब्यात

By सुमित डोळे | Published: March 02, 2024 1:22 PM

आदर्श महिला नागरी सहकारी बँकेचे २०१७-२२ चे रेकॉर्डही नव्याने तपासणार

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या अंबादास मानकापे, त्याचा मुलगा सुनील व सून सुनंदा, संचालक नामदेव कचकुरेला पोलिसांनी पाचव्यांदा हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत २०२२-२३ या एका वर्षात ४८ कोटी ८५ लाख ७२ हजार रुपये हडपल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी तिघांना गुरुवारी ताब्यात घेतले. न्यायालयाने तिघांना ३ मार्चपर्यंत पाेलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आरबीआयच्या निर्देशानंतर बँकेच्या लेखापरीक्षणानंतर डिसेंबर, २०२३ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ दरम्यानचे बँकेच्या मुख्य शाखेचे लेखापरीक्षण केले. त्यात मानकापेने सहकारी बँकेतून पहिल्या टप्प्यात ओम कन्स्ट्रक्शन, आदर्श बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स, आदर्श ऑइल मिल, समर्थ इंटरप्रायजेस, आदर्श डेअरी प्रॉडक्टसच्या नावे लाखोंचे विनातारण कर्ज उचलले. त्यासाठी ना कागदपत्रांची पूर्तता केली ना पुढे कर्जाची परतफेड केली. शिवाय, जवळच्यांनाच कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटली. २०२० मध्येच मानकापेला कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याने सून व अन्य नातेवाइकांना संचालक मंडळावरून वगळून ओळखीतील महिलांना संचालक बनविले. मात्र, मानकापे, त्याची मुले, सहव्यवस्थापक नामदेव कचकुरेंनीच घोटाळा केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक अशोक अवचार या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

- ११ जुलै रोजी आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२ कोटींच्या घोटाळ्यात अंबादास, मुलगा सुनील, सून सुनंदा व वनितासह १३ आरोपींना सर्वप्रथम अटक झाली. यातील १२ आरोपी अद्यापही कारागृहात आहे.- त्यानंतर त्याच्यावर मात्र, याच दरम्यान मानकापेच्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले.- मानकापेकडे व्यवस्थापक असलेल्या देवीदास सखाराम आधाने (रा. नवजीवन कॉलनी) याच्या यशस्विनी संस्थेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.- मानकापे, त्याच्या सुना व मुले एकूण चार घोटाळ्यांच्या पाच गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे. त्यांपैकी त्याला पाचव्यांदा ताब्यात घेण्यात आले.

‘त्या’ पाच वर्षांचेही ऑडिटनिरीक्षक संभाजी पवार यांच्या माहितीनुसार, गुन्हा हा एप्रिल २०२२ ते मार्च, २०२३ दरम्यानच्या घोटाळ्यांचा आहे. मात्र, त्यापूर्वी मानकापे गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. त्यामुळे आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या २०१७-२०२२ दरम्यानच्या स्वतंत्र ऑडिटसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यात घोटाळ्याची रक्कम वाढण्याची दाट शक्यता असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी