शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

'संसाराला हातभार लावत नाहीत', असे रागावल्याने पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 6:31 PM

पती व्यसनासाठी पत्नीकडे पैशांची मागणी करत असे

औरंगाबाद: घरसंसारासाठी एक रूपयाची ही मदत करीत नाही, उलट घरातील पैसे उडवितो, म्हणून रागावणाऱ्या पत्नीचा व्यसनी पतीने गळा आवळून खून केल्याची घटना औरंगाबाद तालुक्यातील सुलतानपुर-वरूड काजी येथे गुरूवारी रात्री घडली. खून केल्यानंतर आरोपी पती पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

कमल जयाजी ओवळेकर (वय ४३,रा. सुलतानपुर,वरूडकाजी)असे मृत महिलेचे नाव आहे. तर जयाजी दत्तू ओवळेकर असे आरोपी नवऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी जयाजी आणि कमल यांचा २५ वर्षापूर्वी विवाह झाला.  त्यांना विवाहित मुलगी अर्चना(वय २१), मुलगा परमेश्वर (१७) आणि ओमकार(वय ७) अशी अपत्य आहे. जयाजीला जुगार, दारूचे व्यसन आहे. या व्यसनापोटी त्याने त्याची शेती विकून टाकली आणि तो खाजगी सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असे. परमेश्वर हा नगर रस्त्यावरील सुपा येथे एका हॉटेलमध्ये कामाला आहे. 

वर्षभरापूर्वी तो वरूडकाजी जवळली सुलतानपुर येथे पत्नी आणि लहान मुलगा ओमकारसह राहण्यास आला. या आधी हे कुटुंब गंगापुर येथे राहात होते. व्यसनापोटी तो कामाच्या ठिकाणी उचल घेऊन  गायब राहतो.  पंधरा दिवसापूर्वी त्याने त्याची मोटारसायकल नारेगाव येथील एका जणाकडे गहाण ठेवून पैसे नेले आणि ते जुगारावर उडविले. कमलबाई ही मजूरी करून मुलाचे पोट भरते. तिच्याजवळ दोन पैसे जमा झाल्यानंतर जयाजी घरी येतो आणि कमलबाईकडून पैसे हिसकावून नेतो. आठ ते दहा दिवसापासून घरातून गायब असलेला जयाजी गुरूवारी रात्री घरी आला. 

सतत घराबाहेर राहणाऱ्या जयाजीने पुन्हा कमलबाईकडे पैशाची मागणी केल्याने त्यांच्यात वाद झाला. चिमुकला ओमकार झोपलेला असताना जयाजीने पत्नी कमलचा गळा आवळून तिचा खून केला. पत्नी निपचित पडल्याचे पाहून जयाजी घर सोडून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, पोलीस कॉन्स्टेबल सुनील गोरे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह घाटीत हलविला.