---
२७ जणांना सुट्टी : २०५ रुग्णांवर उपचार सुरू
---
औरंगाबाद : जिल्ह्यात १० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या २७ जणांना सुटी देण्यात आली, तर २०५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
शहर आणि ग्रामीण भागांत प्रत्येकी पाच कोरोनाबाधित आढळून आले. शहरातील १० आणि ग्रामीण भागातील १७ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने ते घरी परतले. आजपर्यंत १ लाख ४४ हजार ६७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४४५ झाली आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
---
तीन बाधितांचा मृत्यू
घाटी रुग्णालयात वरखेड येथील ३७ वर्षीय महिला, तर खासगी रुग्णालयात न्यू पहाडसिंगपुरा, निरंजननगर येथील ७५ वर्षीय पुरुष, एन ९ सेक्टर मधील ८६ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
---
मनपा हद्दीत ५ रुग्ण
कुशलनगर १, संग्रामनगर २, न्यू उस्मानपुरा २
--
ग्रामीण भागात ५ रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर १, कन्नड १, वैजापूर १, पैठण १ बाधित आढळून आले.