औरंगाबाद : जिल्ह्यात ३१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. तर वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव येथील ७० वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील १३ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून सध्या २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरात ९ तर ग्रामीण भागात २२ कोरोनाबाधित शुक्रवारी आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४७ हजार १४१ कोरोनाबाधित झाले. त्यापैकी १ लाख ४३ हजार ३७१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर उपचारादरम्यान आजपर्यंत एकूण ३ हजार ४८१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील २८९ सक्रिय रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
--
महापालिका हद्दीत ९ रुग्ण --
वेदांत नगर २, जाधववाडी १, संजय नगर १, बेगमपुरा ३, एमआयडीसी कॉलनी १, अन्य १
ग्रामीण भागात २२ रुग्ण
--
वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १५ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. तर औरंगाबाद १, गंगापूर १, कन्नड ३, पैठण २ रुग्ण बाधित आढळले. तर जिल्ह्यातील सर्वाधिक १०६ सक्रिय रुग्ण वैजापूर तालुक्यात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नोंद झालेले मृत्यू हे केवळ वैजापूर तालुक्यातील आहेत. तर इतर तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण असून सोयगाव तालुक्यात सध्या एकही सक्रिय रुग्ण नाही.