---
४४,०१३ कोरोनामुक्त : ४६८ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी ८२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर गेल्या २४ तासांत एकाही बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दिवसभरात ७० जणांचे उपचार पूर्ण झाल्याने त्यांना विविध रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरातील ६३ तर ग्रामीण भागातील ७ रुग्ण त्यामुळे घरी परतले.
आतापर्यंत एकूण ४५ हजार ६८६ बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यापैकी आजपर्यंत ४४ हजार १३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर १२०५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ४६८ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी देण्यात आली.
मनपा हद्दीत ६५ रुग्ण
मयूर पार्क १, उस्मानपुरा १, रामा इंटरनॅशनल परिसर १, जय विश्वभारती कॉलनी १, छत्रपती नगर १, सनी सेंटर १, एन सात ६, एन सहा १, शिक्षक कॉलनी १, राजा बाजार ३, स्नेह नगर १, बन्सीलाल नगर १, बीड बायपास १, आकाशवाणी परिसर १, शहा नगर २, सुरेवाडी १, विवेकानंदनगर २ व अन्य ३९ बाधितांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात १७ रुग्ण
तिसगाव १, गवळी धानोरा १, बजाज नगर ३, रांजणगाव १ अन्य ११ जण बाधित आढळून आले.