लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनुसूचित जातीप्रमाणेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाही यावर्षीपासून कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाºया योजनेत अडीच लाखांची विहीर मंजूर होणार आहे. मात्र या योजनेत केवळ दोन कोटीच मिळाले असून दायित्वच १.३0 कोटींचे आहे. त्यामुळे २५ ते ३0 लाभार्थ्यांनाच लाभ मिळू शकतो.या योजनेत २0१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण २७३ जणांना विहिरी मंजूर झाल्या होत्या. यामध्ये अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांची संख्या २७0 एवढी होती. यात औंढा-६८, वसमत-३, हिंगोली-६१, कळमनुरी-७७ तर सेनगाव-६१ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर औंढा, हिंगोली, सेनगाव तालुक्यात प्रत्येकी एका अपंगाला विहीर मंजूर झालेली आहे. यामध्ये २३९ जणांना विहिरींची तर ३४ जणांनी इलेक्ट्रिक पंप, वीज जोडणी, तुषार संच, ठिबक, विहिरीतील बोअर, सौर पंप आदी बाबींसाठी अर्ज केलेले आहेत. या शेतकºयांना गेल्यावर्षी अनुसूचित जातीप्रमाणे अडीच लाखांचा व इतर बाबींसह तीन लाख दहा हजार रुपयांच्या पॅकेजचा लाभ मिळाला नव्हता. मात्र यंदा विशेष घटकप्रमाणेच आदिवासी उपययोजनेतही सर्व प्रकारचे लाभ व त्यासाठीचा मोबदला यात सारखेपणा आणला गेला आहे. मात्र काही जण गेल्यावर्षीच्या लाभार्थ्यांनाही अडीच लाख मोबदल्याची मागणी करीत आहेत.
आदिवासींनाही विहिरीस २.५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:13 AM
अनुसूचित जातीप्रमाणेच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनाही यावर्षीपासून कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाºया योजनेत अडीच लाखांची विहीर मंजूर होणार आहे. मात्र या योजनेत केवळ दोन कोटीच मिळाले असून दायित्वच १.३0 कोटींचे आहे. त्यामुळे २५ ते ३0 लाभार्थ्यांनाच लाभ मिळू शकतो.
ठळक मुद्देयंदा झाली वाढ : अल्प तरतुदीचा प्रश्न