सिल्लोड : तालुक्यात पीक कर्जासाठी बँका शेतकºयांची अडवणूक करीत आहे. शेतकºयांचे मागणी अर्ज गटसचिव, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवकांनी भरून घ्यावे व शेतकरीनिहाय अहवाल तहसील कार्यालय, सहनिबंधक सहकारी संस्था सिल्लोड यांना द्यावा, असे आदेश तहसीलदार संतोष गोरड यांनी संबंधित यंत्रणेला गुरुवारी दिले. दरम्यान, १३ जुलै रोजी सर्व बँकांमध्येशेतकरी मेळावे घेण्याच्या सूचनाही तहसीलदारांनी दिल्या. शेतकºयांच्या या समस्येवर १२ जुलै रोजी लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने दखल घेतली.उपरोक्त महसूल कर्मचारी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती, ग्रामीण बँका, सोसायटी कार्यालयात जाऊन शेतकºयांचे मागणी अर्ज शुक्रवारी भरून घेणार आहेत. महाराष्ट्र शासनाने शेतकºयांना सुलभ पीक कर्ज वाटप करण्यासाठी आता महसूल प्रशासनास कामाला लावले आहे. वरील कर्मचाºयांनी १३ जुलै रोजी सर्व बँकेत जाऊन ज्या शेतकºयांना बँका पीक कर्ज देत नाही, अशा शेतकºयांनी पीक कर्ज मागणी अर्ज भरून द्यायचा आहे. ते अर्ज कर्मचारी लगेच बँकेला देऊन कर्ज देण्याच्या सूचना देतील. यासाठी शेतकºयांनी आपापल्या हद्दीतील बँकेत हजर राहावे, असे आवाहन सहनिबंधक डी. आर. मातेरे, तहसीलदार संतोष गोरड, सहकार अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी केले आहे.मागणी अर्ज भरून घेतल्यावरसुद्धा पात्र शेतकºयांना बँकेने पीक कर्ज दिले नाही तर त्या बँक अधिकाºयांचा अहवाल सहनिबंधक व तहसीलदार शासनाला पाठविणार असून अशा अधिकाºयांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे काही अंशी का होईना शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.कोट...हलगर्जीपणा करणाºयांवर कारवाईशासनाने प्रत्येक बँकेला २०१८ मध्ये पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. पात्र लाभार्थ्यांना पीक कर्ज देणे बँकेला बंधनकारक आहे. यात कुणी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय बँक शाखेनिहाय मेळावे शुक्रवारी घेण्यात येणार आहे. यासाठी सर्कलनिहाय तलाठी, ग्रामसेवक, गट सचिवांची नेमणूक केली आहे. त्यांनी बँकेत हजर राहून शेतकºयांचे पीक कर्ज मागणी अर्ज भरून घ्यावे. यात कुणी गैरहजर राहिले, अथवा हलगर्जीपणा केला तर कारवाई करण्यात येईल.- संतोष गोरड, तहसीलदार, सिल्लोड
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला धावले प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:48 PM