शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

मराठवाड्यातील ५२ नगरपरिषदांवर ‘प्रशासकराज’; इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले

By विकास राऊत | Published: August 02, 2023 1:31 PM

दोन वर्षांपासून सर्व काही ‘जैसे थे’; जानेवारी २०२५ पासून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तब्बल ५२ नगरपरिषद/नगरपंचायतींवर सुमारे दोन वर्षांपासून ‘प्रशासकराज’ आहे. यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या गुडघ्याचे बाशिंग गळून गेले आहे. निवडणुका केव्हा होणार, याबाबत काहीही शाश्वती सध्या नसल्यामुळे इच्छुकांचे डोळे राजकीय भूमिकेकडे लागलेले आहेत. मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कचाट्यात निवडणुका अडकल्यानंतर पुढे सामाजिक आरक्षणाच्या लपेट्यात आल्या. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जे इच्छुक होते, त्यांचेही डोके चक्रावून गेले आहे. कुणाचा झेंडा घ्यावा हाती, या संभ्रमात सध्या कार्यकर्ते आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून सध्या आहेत.

मनपा, जि. प.वरही प्रशासक...मराठवाड्यात सध्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व नांदेड-वाघाळा या मनपा असून यावरही प्रशासक आहेत. तसेच आठही जि. प.च्या निवडणुका अद्याप झालेल्या असून मुख्य कार्यकारी अधिकारीच त्यावर प्रशासक म्हणून आहेत. जालना नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. ज्यावेळी निवडणुका घेण्याचा निर्णय होईल, त्यावेळी जालना मनपा असेल.

प्रशासकराज असलेल्या नगरपरिषदा...औरंगाबाद जिल्हा : कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्रीजालना : जालना, अंबड, भोकरदन, परतूरपरभणी : गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठहिंगोली : वसमत, हिंगोली, कळमनुरीबीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी-वैद्यनाथ, गेवराई, धारूरनांदेड : अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, किनवटधाराशिव : धाराशिव, भूम, कळंब, मुरूम, नळदूर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूरलातूर : उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा,

कोरोनानंतर नेमके काय?कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता होती. परंतु सामाजिक आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुका लांबत गेल्या. त्यानंतर जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे निवडणुकांचा मुद्दा मागे पडला. यावर्षी निवडणुका होतील, असा अंदाज असतानाच पुन्हा जुलै २०२३ मध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपाच्या धक्क्यातून मतदारांवर कसा परिणाम झाला असेल, हे निवडणुका झाल्यावरच कळेल.

अशी चर्चा२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकीत स्था. स्व. संस्थांमध्ये उमेदवारी देण्याचे इच्छुकांना आश्वासित करून त्यांना निवडणुकीत कामाला लावले जाईल. दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांची पुढील पाच वर्षांपर्यंत काही गरज नसेल, स्था. स्व. संस्थेत मर्जीतल्यांना उमेदवारी देऊन धुराळा उडवून टाकायचा. त्यामुळे जानेवारी २०२५ पासून पुढे या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाMarathwadaमराठवाडा