शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

कौतुकास्पद ! फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांची धोका पत्करून निदानाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 7:17 PM

आठ तास पीपीई कीट घालून काम करणाऱ्या या फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधत ते करीत असलेल्या निदानाची धडपड जाणून घेतली.

ठळक मुद्देटीव्ही सेंटरवर कार्यरत मनपा पथकातील फ्रंटलाईन कोरोना योद्धे

- योगेश पायघन 

औरंगाबाद : प्रत्यक्ष कोरोनाचे रुग्ण शोधणे तसे जोखमीचे काम. त्यातही बाधित रुग्ण शोधण्यासाठी स्वॅब घेऊन काही मिनिटांत निदान करून देण्यासाठी अँटिजन टेस्ट करण्यासाठी तैनात पथकाचे काम कौतुकास्पद आहे. आठ तास पीपीई कीट घालून काम करणाऱ्या या फ्रंटलाईन कोरोना योद्ध्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधत ते करीत असलेल्या निदानाची धडपड जाणून घेतली.

अँटिजन कीटद्वारे रुग्ण शोधण्यासाठी टीव्ही सेंटर येथे तैनात मनपाच्या पथक क्रमांक १० मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी सावरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. प्राजक्ता साळवे, तंत्रज्ञ फहाद चाऊस, समन्वयक अक्षय अंभोरे, लिपिक शैलेश इवरकर, शिपाई कल्याण जंजाळ, फवारणी कर्मचारी श्रावण सोनवणे, माहिती संकलक शेख अमिनोद्दीन काम करीत आहेत. नागरिकांना सूचना देणे, नोंदणी, विशिष्ट क्रमांक देणे, स्वॅब घेतलेल्यांना एका ठिकाणी थांबवणे, तांत्रिक चुका टाळून वेळेवर योग्य अहवाल देण्याचे काम करताना बाधित शोधून त्यांना कोविड सेंटरला रवाना करण्याच्या कामात पथकातील सदस्य सोमवारी व्यस्त होते. पीपीई कीटमुळे होणाऱ्या उकाड्यात घामाने भिजलेले डॉक्टर, तंत्रज्ञ काम करताना नव्याने रुजू झालेल्या तज्ज्ञांनाही प्रशिक्षण देताना बाधित रुग्णांना समुपदेशनाचे काम कर्मचारी करीत होते.

जैविक कचरा संकलनाचे काम एकदिलाने  सकाळी १० वाजेपासून पथकाचे काम सुरू होते. दिवसभरात दोनशे ते अडीचशे स्वॅब घेणे, त्यातून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रिपोर्ट देणे. निगेटिव्ह लोकांना घरी, तर पॉझिटिव्ह रुग्णांना वाहनाची व्यवस्था करून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पोहोचवणे, या सर्व नोंदी सहा वाजता पथकाचे काम थांबल्यावर वॉर रूमला माहिती देणे. कीटच्या वापराचे विवरण, दिवसभरातील जमा झालेले बायोमेडिकल वेस्ट जमा करण्याचे काम पथकातील सदस्य एकदिलाने करीत आहेत.- अक्षय अंभोरे, टास्क फोर्स पथक समन्वयक

समाजासाठी कामाचे समाधान : क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्यसेवा केली. मात्र, फिल्डवर जाऊन करीत असलेल्या या कामातून समाजासाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. नेहमीच्या चिकित्सालयीन कामापेक्षा कोरोनात कामाची, जगण्याची पद्धत बदलली. पीपीई कीटमध्ये आठ तास काम करणे वाटते तेवढे सोपे नाही. आरोग्यसेवा देताना स्वत:लाही संसर्गापासून वाचविण्यासाठी काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.-डॉ. प्राजक्ता साळवे, दंत चिकित्सातज्ज्ञ, मनपा अँटिजन तपासणी पथक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद