लोकमत न्यूज नेटवर्कपाचोड : तब्बल २५ वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर पाचोड परिसरात गु-हाळ सुरु झाल्याने गु-हाळप्रेमींची पावले तिकडे वळू लागली आहेत. पैठण तालुक्यातील पाचोड येथील एका तरूणाने नोकरीच्या मागे न लागता जोडधंदा म्हणून शेतीकडे लक्ष वळविले आणि यंदा गु-हाळ सुरु केले.थेरगाव येथील प्रदीप वसंत हुलजुते (कासार) या तरुणाने एका नागरी पतसंस्थेत काम करुन खडकाळ जमिनीवर उसाची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली.जैविक खते देऊन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले खरे, पण शासनाकडून योग्य भाव मिळत नसल्यामुळे या तरुणाने उसाचे गु-हाळ सुरू केले असून तेथे रसायनमुक्त गूळ निघत आहे.पाचोड परिसर तसा टंचाईग्रस्त भाग आहे. या परिसरात बाराही महिने पाणीटंचाई असते.मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने परिसरात पाणी अडविल्या गेले व त्याचा फायदा विहिरी, कुपनलिकांना झाला. यामुळे शेतकरी पुन्हा गहू व उसाकडे वळले. प्रदीप कासार याने जैविक खत, ठिबकवर योग्य नियोजन करुन ऊस चांगला बहरात आणला.हा ऊस रसायनमुक्त असल्यामुळे व या ऊसाची वाढ विक्रमी झाल्यामुळे हा ऊस बघण्यासाठी औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी येत आहेत.उसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे या शेतक-याने कारखान्याला ऊस न देता सरळ गु-हाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. कमी खर्चात रसायनमुक्त शेती करण्याचे धाडस करणाºया तरुणाला ऊसाचे विक्रमी उत्पन्न झाले आणि त्याने गुºहाळ सुरू केले. यातील गूळ आम्ही महाराष्टÑासह परराज्यात विक्रीसाठी पाठविणार असल्याचे प्रदीप कासार या शेतकºयाने सांगितले. २५ वर्षांनंतर गुºहाळ सुरु झाल्याने अनेक शेतकरी व नागरिक उत्सुकतेने गुºहाळ पाहण्यासाठी येत आहेत.
२५ वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर पाचोड परिसरात गु-हाळ सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:27 AM