शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

By विकास राऊत | Published: May 21, 2024 12:59 PM

१२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार, यावरून सट्टाबाजार गरम झालेला आहे. तसेच राजकीय वर्तुळात रोज नव्याने आकडेमोड होत आहेत. बूथनिहाय मतदानाच्या आकड्यांवरूनही राजकीय धुरीण आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीला लागले आहे. १२ लाख ९९ हजार ४० मतदारांनी कुणाला कौल दिला आहे, यासाठी २७ फेऱ्याअंती मतमोजणी करून निकाल लागणार आहे. ४८ हजार ११२ मते प्रत्येकी एका फेरीत मोजली जाणार आहेत. साधारणत: दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४ जूनची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. बीडबायपास परिसरातील एमआयटी कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल.

२०४० मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सकाळी ६ वा. रुजू व्हावे लागेल. सकाळी ७ वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर ८ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर ८:३० वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल.

मतमोजणी प्रतिनिधी कसे येणार....उमेदवारांना मतमोजणी टेबलासाठी एक प्रतिनिधी नियुक्त करण्याची मर्यादा आहे. ३१ मे पर्यंत आवश्यक कार्यवाही करून ओळखपत्र संबंधितांना घेणे आवश्यक आहे. प्रतिनिधींना ओळखपत्र तसेच अर्जासोबत उमेदवारांनी नियुक्तीसाठी दिलेले पत्र सोबत बाळगावे लागेल. प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात सकाळी सात वाजेपर्यंतच प्रवेश मिळेल. त्यांना चैतन्य टेक्नो स्कूल येथून केंद्रात येण्यासाठी प्रवेशद्वार आहे. निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, इतर माध्यम प्रतिनिधींना एमआयटी कॉलेजच्या फूड टेक्नॉलॉजी विभाग येथून केंद्रात जाता येईल. मत मोजणी केंद्रात मोबाइल नेण्यास मनाई आहे, तर माध्यम प्रतिनिधींना मीडिया सेंटरमध्ये मोबाइल नेता येईल. कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन पार्किंग तेथेच असेल, असे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

काय असेल मतमोजणी केंद्रावरविधानसभानिहाय १४ टेबलविधानसभानिहाय पोस्टलसाठी १० टेबलमतमोजणीसाठी १ हजारहून अधिक अधिकारी, कर्मचारीपहिले रॅण्डमायझेशन २७ मे रोजी२८ मे रोजी मतमोजणीचे प्रशिक्षण४ जून रोजी मतमोजणी केंद्रात शेवटचे प्रशिक्षण

सीसीटीव्हीच्या निगराणीत बॅलेट युनिट...मतदान यंत्रे एमआयटी कॉलेज परिसरातील एका इमारतीतील स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आहेत. केंद्रीय सशस्त्र पोलिस बल, राज्य राखीव पोलिस बल व राज्य पोलिस दलाचे अधिकारी व जवान अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत आहे.-देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

किती फेऱ्या होणार...कन्नड २६ फेऱ्या : २ लाख १७ हजार ८९औरंगाबाद मध्य २३ फेऱ्या : २ लाख ११ हजार ५००औरंगाबाद पश्चिम २७ फेऱ्या : २ लाख ३५ हजार ७८४औरंगाबाद पूर्व २२ फेऱ्या : २ लाख ६ हजार ६३३ मतदानगंगापूर २५ फेऱ्या : २ लाख २७ हजार १५२वैजापूर २५ फेऱ्या : २ लाख ८८२एकूण : १२ लाख ९९ हजार ४०

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४