संजय तिपाले , बीडएकीकडे दिवाळीचा धूमधडाका तर दुसरीकडे दिवाळीपूर्वीच संसार पाठीवर घेऊन कारखान्याचा रस्ता पकडणारे ऊसतोड मजूर... हे नेहमीचे चित्र यंदा नाही. विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सहा लाख ऊसतोड मजुरांनी कोयते म्यान केले आहेत. संपामुळे १८ वर्षानंतर पहिल्यांदाच मजुरांनी गावी दिवाळी साजरी केली. या मजुरांना नव्या सरकारची प्रतीक्षा आहे.विजयादशमीनंतर ऊसतोड मजुरांना हंगामाचे वेध लागतात. मजुरांच्या स्थलांतराने गावच्या गावे रिकामी होतात. त्याचा परिणाम बाजारपेठेवरही होतो. अर्थकारणावर थेट परिणाम करणाऱ्या स्थलांतराला यावेळी ‘ब्रेक’ बसला तो मजुरांच्या आंदोलनाने! प्रलंबित मागण्यांसाठी संप सुरु असल्याने यावेळी दिवाळीच्या सणातही मजुरांनी गाव सोडले नाही. बिऱ्हाड पाठीवर घेऊन रोजगाराच्या शोधार्थ स्थलांतर करणाऱ्या मजुरांची दिवाळी आतापर्यंत फडातच साजरी व्हायची. एकीकडे दिव्यांचा झगमगाट, गोडधोड पदार्थांची रेलचेल, नवे कोरे कपडे, फटाक्यांची आतषबाजी... अशी धूमधडाक्यात दिवाळी साजरी होत असतानाच दिवाळीतही ऊसतोड मजुरांच्या हातचा कोयता काही सुटत नव्हता. पाचटापासून बनविलेल्या कोप्यांमध्ये अंधार मिटविण्यासाठी पेटविलेला कंदिलच दिवाळीतील दिव्याची भूमिका बजवायचा... अंगावर फाटके कपडे, भाकरी-ठेच्यामध्येच सुख शोधायचे अन् कोयत्याच्या घावानंतर निघालेल्या आवाजाला फटाक्यांचा आवाज समजून समाधान मानायचे... दिवाळीतही उपेक्षित जिणे जगणाऱ्या ऊसतोड मजुरांना यंदा मात्र, सणाचा आनंद आपल्या गावात अन् स्वत:च्या कुटुंबियांसमवेत साजरा करता आला. वयोवृद्ध गावाकडे अन् तरुण मुले, सुना ऊसतोडीला... यामुळे दिवाळी साजरी करणार तरी कशी? असे कोडे ऊसतोड मजूर कुटुंबियांपुढे असायचे;परंतु यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रित होते.नव्या सरकारकडून अपेक्षाऊसतोड मजुरांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य केल्याशिवाय एकही मजूर गाव सोडणार नाही. आम्ही मजुरांना घ्यायला आलेली वाहने अडवून त्यांना रोखून ठेवले आहे. नव्या सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. सरकारस्थापनेनंतर आम्ही आमची मागणी त्यांच्यापुढे ठेवणार आहोत. तोपर्यंत संप सुरुच राहील असे, ऊसतोड कामगार संघटनेचे राज्य सचिव श्रीरंग भांगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.१९९६ मध्ये झाले होतेव्यापक आंदोलनयापूर्वी १९९६ मध्ये ऊसतोड मजुरांचे व्यापक आंदोलन झाले होते. तेंव्हा युतीचे सरकार होते. गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होते. मजुरांच्या आंदोलनानंतर मुंडे यांनी त्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी ‘खुर्ची गेली तरी चालेल;परंतु माझ्या ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे’ अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर मजुरांच्या मागण्या मान्य झाल्या होत्या. आंदोलनामुळे तेंव्हा मजुरांना गावातच दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर एकदाही मजूर दिवाळीत गावी नव्हते. संपाने यंदा गावातील दिवाळीचा योग पुन्हा आला.४कोयत्यावर पोट भरणाऱ्या सहा लाख मजुरांचा जगण्याचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरु आहे. ४पिढ्यामागून पिढ्या ऊसतोडीची कष्टाची कामे करण्यात गेल्या;परंतु मजुरांच्या हातातील कोयता काही दूर झाला नाही. ४ऊसतोड मजुरांच्या मागण्याही फार मोठ्या नाहीत;परंतु ऊसतोड मजुरांना आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही.४‘व्होट बँक’ म्हणून त्यांच्या मतांवर मात्र अनेकांनी खुर्च्या उबविल्या, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट यांनी व्यक्त केली.उसतोड कामगारांना हार्वेस्टिंगप्रमाणे एक टन उसतोडणीला ४०० रुपये मजुरी द्यावी़४मुकादमांच्या कमिशनमध्ये ३० टक्क्यांपर्यंत वाढ करावी़४ऊस वाहतुकीमध्ये तिप्पट वाढ करावी़४उसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे़४कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळांना मान्यता द्यावी़४उसतोड कामगारांना वीमा मंजूर करण्यात यावा़
४१८ वर्षानंतर मजुरांची दिवाळी गावात
By admin | Published: October 25, 2014 11:28 PM