करमाड : जायकवाडी धरणातील पाणी लहुकी मध्यम प्रकल्प बनगाव, सुखना मध्यम प्रकल्प व हिवरा येथील लघु प्रकल्पात एक्सप्रेस जलवाहिनीद्वारे सोडण्यात यावे, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारपासून करमाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरु करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी बी. व्ही. वाघमारे यांनी मंगळवारी दुपारी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
प्रहार संघटनेच्या वतीने याच मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते. त्यानंतर प्रहारच्या वतीने सोमवारपासून अन्नत्याग उपोषणास पदाधिकारी व कार्यकर्ते बसले होते.
त्यानंतर पाटबंधारे विभागाने मंगळवारी दखल घेत उपविभागीय अधिकारी भास्कर वाघमारे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कार्याध्यक्ष प्रभाकर भुसारे, तालुका संपर्कप्रमुख नानासाहेब गोजे, युवा तालुकाप्रमुख राम गाडेकर, जिल्हा संघटक बाबूराव मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना म्हस्के, महिला आघाडी तालुकाध्यक्षा उज्ज्वला लहाने, मंगेश साबळे, हरिभाऊ जाधव आदी उपस्थित होते.