शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
5
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
6
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
7
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
8
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
9
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
10
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
11
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
12
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
13
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
14
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
17
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
18
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
19
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
20
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री

By विकास राऊत | Published: April 24, 2023 8:12 PM

गुलाबी वादळ मराठवाड्याची राजधानीत; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा ६० हून अधिक वाहनांचा ताफा

छत्रपती संभाजीनगर: दाक्षिणात्य सिनेमांमध्ये हिरोची जशी वाहनांच्या लांबलचक रांगांसह धमोकदार एण्ट्री होते. तसाच काही अनुभव तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे सर्वेसर्वा के.चंद्रशेखर राव यांच्या शहरातील प्रवेशाप्रसंगी आला. तेलंगणा राज्याच्या विशेष पोलिस बंदोबस्तासह शहर पोलिसांचा ताफा, डीव्ही कारसह समर्थकांच्या वाहनांनी विमानतळपासून जालना रोडमार्गे एन-१ टाऊन सेंटरपर्यंत पुर्ण रस्ता व्यापला होता. ६० हून अधिक वाहने त्यांच्या ताफ्यात होते.

२७ एप्रिल रोजी बीआरएस पक्षाचा वर्धापनदिन आहे. तर १ मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. या दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिली सभा २४ एप्रिल रोजी झाली. या सभेला मुख्य मार्गदर्शन राव यांनी केले. सभेला जाण्यापुर्वी बीआरएसचे पदाधिकारी अभय चिकटगांवर यांच्या निवासस्थानी त्यांनी चहापान घेतले. राज्यातील प्रमुख मंत्री आणि खासदार व नेत्यांसह त्याचा ताफा ६ वाजून ४० मिनिटांनी आला. ताफ्यात एक-दोन नव्हे तर ६० हून अधिक वाहने तेलंगणा आरटीओ पासिंगचे होते. हा सगळा लवाजमा पाहून दाक्षिणात्य चित्रपटातील हिरोंची जशी एण्ट्री होते, तसाच काही अनुभव परिसरातील नागरिकांनी घेतला.

बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजरसाऊथच्या चित्रपटांनी बॉलीवूडची पुरती पाचावर धारण बसविली आहे. बाहूबली, पुष्पा, कांतारा, केजीएफ सारख्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर खातेही उघडू दिलेले नाही. साऊथचे चित्रपट टी.व्ही.वर देखील धुमाकूळ घालत आहेत. हे सगळे होत असतांना साऊथच्या एमआयएम या पक्षाने मागील आठ वर्षांपुर्वीच राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता भारत राष्ट्र समितीने नांदेडमार्गे मराठवाड्याच्या राजधानी गुलाबी वादळ आणले. आधी चित्रपट आणि आता राजकारण टेकओव्हर करण्यात साऊथ बाजी मारणार की काय, अशी चर्चा सामान्यांमध्ये आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावAurangabadऔरंगाबाद