शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:14 AM

औरंगाबाद : एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने घाटीत सोमवारी गोंधळ ...

ठळक मुद्दे सलग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना मारहाण : डॉक्टरांनीच मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप

औरंगाबाद : एका महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याने घाटीत सोमवारी गोंधळ निर्माण झाला. नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला, तर डॉक्टरांनीच मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.वनिता दादाराव शेंडगे (२९) असे मृत महिला रुग्णाचे नाव आहे. स्वाईन फ्लूसदृश आजारामुळे वनिता यांच्यावर खाजगीत उपचार सुरू होते. उपचारासाठी व्हेंटिलेटरचा खर्च परवडत नसल्याने १३ आॅक्टोबर रोजी नातेवाईकांनी त्यांना घाटीतील स्वाईन फ्लू वॉर्डात दाखल केले. उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी वनिता शेंडगे यांचा मृत्यू झाला. दादाराव शेंडगे यांनी सांगितले, डॉक्टरांनी वेळीच उपचार करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्यावर रविवारी उपचार सुरू करण्यात आले. रुग्णाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु भावाने प्रकृतीबाबत विचारणा केली, तेव्हा डॉक्टरांनी वाद घातला. त्यानंतर अर्ध्या तासात रुग्णाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा जाब विचारताच डॉक्टरांनी भावाला मारहाण केल्याचा आरोप दादाराव शेंडगे यांनी केला. परीक्षा असतानाही रुग्णालयात आलो होतो; परंतु रुग्णाच्या प्रकृतीची विचारणा के ल्यावरून डॉक्टरांनी मारहाण केल्याचे भगवान शेंडगे यांनी फाटलेला शर्ट दाखवित सांगितले.उपचारासाठी पूर्ण प्रयत्नघटनेनंतर निवासी डॉक्टर आणि रुग्णाचे नातेवाईक बेगमपुरा पोलीस ठाण्यात जमा झाले. डॉक्टरांनी मारहाण करणाºयांना अटकेची मागणी केली. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना स्टूल मारण्याचा प्रयत्न केला, असे घाटीतील डॉक्टरांचे म्हणणे आहे, तर डॉक्टरांनीच मारहाण केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे, असे सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी सांगितले. आम्ही नातेवाईकांना मारहाण केली नव्हे तर स्वत:चा बचाव केला. रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर पूर्ण प्रयत्न करीत असतात; परंतु नातेवाईक डॉक्टरांवर राग काढत असल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले.२४ तासांत दुसरी घटनावॉर्ड क्रमांक ८-९ मध्ये दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी रात्री नातेवाईकांनी दोन डॉक्टरांना मारहाण केली होती. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मेडिसिन विभागात २४ तासांत डॉक्टरांना मारहणीची सोमवारी दुसरी घटना घडली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर