गंगापूर : तालुक्यातील ढोरेगाव शिवारात गट क्रमांक १२ मध्ये चेहरा विद्रूप झालेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुनील प्रकाश जमधाडे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी अक्षय बापू वीर (२१, रा.रांजणगाव खुरी ता.पैठण) या आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य एकजण फरार आहे.
वाळूज औद्योगिक विकास महामंडळच्या रेल्वेस्टेशन कार्यालयात पाणी पुरवठा विभागातील शिपाई सुनील प्रकाश जमधाडे (४०, रा.पाटोदा औरंगाबाद ह.मु.शरणापुर) यांचा मृतदेह संशयित रित्या तालुक्यातील ढोरेगाव शिवारात गट क्रमांक १२ मध्ये सोमवारी (२) रोजी सकाळी ११ वाजता आढळून आला होता. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून अज्ञाताचा विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात, रविवारी वाळूज परिसरातील एका वाईन शॉपवर अक्षय वीर आणि सुनीलसोबत दारू खरेदी करत असल्याचे सीसीटीव्हीत फुटेजमध्ये दिसून आले. यावरून पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन विचारपूस केली .पोलिसी खाक्या दाखवताच अक्षय याने एका मित्रासोबत मिळून सुनीलचा खून केल्याची कबुली दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि प्रदीप दूबे, सहपोनि साईनाथ गीते, पोलीस ठाणे पैठण येथील पोह गणेश खंडागळे सय्यद झिया, सफी दगडू जाधव, पोह लहू थोटे, नामदेव सिरसाठ, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, संजय घुगे, पोना दिपक सुरोसे, उमेश बकले, वाल्मीक निकम, संतोष डमाळे, पोकों ज्ञानेश्वर मेटे यांनी केली.
दुसरा आरोपी मृताची गाडी घेऊन फरार सुनील जमदाडेसह ढोरेगावकडे जात असताना रस्त्यात भांडण झाले. यामुळे अक्षय आणि त्याच्या सोबत्याने सुनीलला काठीने मारहाण केली. ढोरेगाव येथील शेतात नेऊन माझ्या सहकार्याने त्याचा गळा आवळला, चेहऱ्याची ओळख पटू नये म्हणून तोंड दगडाने ठेचल्याची कबुली अक्षयने दिली. दुसरा साथीदार मृताच्या दुचाकीसह फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.