देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. गतवर्षी कोरोनावर ठोस औषध उपलब्ध नव्हते; पण आता लस उपलब्ध झाल्याने जास्तीत जास्त लसीकरण करून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत असल्याने टप्प्याटप्प्याने लसीकरणाची गती वाढविली जात आहे. महापालिकेने लसीकरणाचा पावणेदोन लाखांचा टप्पा पूर्ण केला आहे. यातील ६५ जण लस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. काही जण पहिल्या डोसनंतर, तर काही जण दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाबाधित झाले आहेत. मात्र, इतर रुग्णांपेक्षा त्यांना त्रास कमी होतो, जिवाला धोका राहत नाही, रुग्ण गंभीर होत नाही, असे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.
पहिल्या, दुसऱ्या डोसनंतर ६५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:04 AM