शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

छेडछाड प्रकरणात २४ तासांत तपास करत पोलिसांनी आरोपीविरुद्ध जमा केले भक्कम पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 12:58 PM

Molestation case; crime news शिवाजीनगर येथील तरुणाने दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता.

ठळक मुद्देगुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस तपासाला लागले आणि घटनास्थळ पंचनामा केलायावेळी आरोपी आणि पीडिताचे मोबाइल लोकेशन काढून तांत्रिक पुरावा हस्तगत केला.घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविले.

औरंगाबाद : तरुणीची छेड काढून विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, पीडिता आणि आरोपींचे मोबाइल टॉवर लोकेशन, तब्बल आठ साक्षीदारांचे जबाबसह भक्कम पुराव्यानिशी २४ तासांत आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयांत दोषारोपत्र सादर केले.

शिवाजीनगर येथील तरुणाने दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तिचा पाठलाग करून रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिंदेसह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस तपासाला लागले आणि घटनास्थळ पंचनामा केला, आठ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी आरोपी आणि पीडिताचे मोबाइल लोकेशन काढून तांत्रिक पुरावा हस्तगत केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळविले. पीडिता आणि आरोपी यांच्यातील वाद एका प्रत्यक्षदर्शीने त्याच्या मोबाइलमध्ये कैद केला होता. ही मोबाइल क्लीप पुरावा म्हणून पोलिसांनी हस्तगत केली. पीडितेचा पाठलाग करण्यासाठी आरोपींनी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली. याबाबतचा जप्ती पंचनामा करून आरोपीविरुद्ध २४ तासांत दोषारोपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. फौजदार विठ्ठल घोडके, यांनी हा तपास केला. हवालदार रमेश सांगळे, शिवाजी गायकवाड यांनी त्यांना मदत केली.

आरोपी शिंदे सुटला जामिनावरआरोपी शिंदेला अटक करुन पोलिसांनी दोषारोपपत्रासह त्याला मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले. यावेळी तपास पूर्ण झाल्यामुळे त्याला जामिनावर मुक्त करावे, अशी विनंती त्याच्या वकिलांनी न्यायालयास केली. न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांच्या वयक्तिक जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. यामुळे तो जामिनावर सुटल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडितेचा न्यायालयासमोर नोंदविला जबाबविनयभंगाच्या या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी पीडितेला वारंवार न्यायालयात येण्याची आवश्यकता भासू नये याकरिता पोलिसांच्या विनंतीनुसार मंगळवारी सकाळी न्यायालयाने तिचा जबाब (कलम १६४ नुसार ) नोंदवून घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिस