शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मुंबईत गेल्यावर सेना-भाजपमध्ये फाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:58 PM

शहर बसचे लोकार्पण, १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन, भूमिगत गटार योजनेच्या एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात तारीख आणि वेळ देण्याचे आश्वासन आज मुंबईत भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.

ठळक मुद्देमहापालिका : मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात येणार, शिवसेना आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण करणार

औरंगाबाद : शहर बसचे लोकार्पण, १०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन, भूमिगत गटार योजनेच्या एसटीपी प्लँटचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील आठवड्यात तारीख आणि वेळ देण्याचे आश्वासन आज मुंबईत भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. सेना पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने त्यांनी नियोजित २३ डिसेंबर रोजी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सर्व विकासकामांचे लोकार्पण,भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासात राजकारण नको, असे कालपर्यंत म्हणणाºया सेना-भाजप पदाधिकाºयांचे मुंबईत गेल्यावर चांगलेच फाटले.शहरातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सढळ हाताने मदत केली. रस्त्यांसाठी १०० कोटी दिले. कचºयासाठी ९० कोटी दिले. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे शहराचा विकास होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या शहर बसचे लोकार्पण, १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, एसटीपी प्लँटचे लोकार्पण आदी कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्र्यांनाच बोलवा, असा आग्रह महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाºयांनी शिवसेनेसमोर धरला. शिवसेनेने अगोदरच २३ डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी आमंत्रित करून ठेवले आहे. भाजपसोबत युतीधर्म पाळायचा म्हणून मंगळवारी सकाळी सेना-भाजपचे पदाधिकारी मुंबईला रवाना झाले. मुंबईत गेल्यावर महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, विकास जैन यांनी पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी निघून गेले. सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर सर्व जण भेटण्याचे निश्चित झाले. भाजपच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, उपमहापौर विजय औताडे, ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात आदींची उपस्थिती होती. सायंकाळी नियोजित वेळेत शिष्टमंडळ पोहोचले नाही. पाच मिनिटे उशीर झाला. तोपर्यंत मुख्यमंत्री, भाजप आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत बैठकीत बसले. मनपा शिष्टमंडळाने त्यांना चिठ्ठी पाठविली. त्यांनी भाजपचे संघटनमंत्री सुरजितसिंग ठाकूर, अतुल सावे यांना बोलावून पुढील आठवड्यात औरंगाबादला येण्याचे आश्वासन दिले. हा निरोप ठाकूर आणि सावे यांनी बाहेर मनपा पदाधिकाºयांना दिला. त्यानंतर लगेच सेनेच्या पदाधिकाºयांनी वर्षा निवासस्थान सोडले.शिवसेना जुन्या निर्णयावर ठाम२३ डिसेंबर रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन सोहळा उरकण्याच्या निर्णयावर शिवसेना ठाम आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, आज आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्यासाठी गेलो होतो. त्यांची भेट झाली नाही. रेल्वेचा वेळ होत असल्याने आम्ही लवकर निघालो. आदित्य ठाकरे यांची वेळ आम्ही अगोदरच घेतली आहे. त्यामुळे नियोजित तारखेलाच कार्यक्रम होईल.शहराला परिणाम भोगावे लागणार...शिवसेना-भाजपच्या या अंतर्गत सुंदोपसुंदीचा फटका शहराला बसणार आहे. राज्य शासनाने अद्याप महापालिकेला १०० कोटी रुपये वर्ग केलेले नाहीत. राज्य शासनाने हा निधी देण्यास नकार दिल्यास....नियोजित ३२ सिमेंट रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वीच रद्द करावी लागतील. मुख्यमंत्री पुढील आठवड्यात विकासकामांच्या उद्घाटनास आल्यास शहराला आणखी १०० कोटींचा निधी देण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपच्या या लुटुपुटुच्या लढाईत शहराचे नुकसान होणार हे निश्चित.आदित्य ठाकरे यांनी निधी द्यावाशहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करायला भाजपची अजिबात हरकत राहणार नाही. शहरात आणखी १०० कोटींचे रस्ते करायचे आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी आता भाजपने केली आहे. सेना नेत्यांकडून विकासकामांसाठी एक रुपयाही मिळालेला नसताना त्यांच्या हाताने संपूर्ण विकासकामांचे उद्घाटन कसे करणार, असा प्रश्न उपमहापौर विजय औताडे, राजू शिंदे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा