- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नोटीस न देता थकीत वीज बिलांसाठी मीटर काढून नेल्याचा आरोप करत भाजप आ. बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांनी ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महावितरणने कारवाई करण्याची तयारी केली, परंतु त्यापूर्वीच आमदार लोणीकर तब्बल ४ लाख रुपयांचे थकीत वीज बिल भरल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. (BJP MLA Babanrao Lonikar paid all the pending electricity bills)
आ. लोणीकर यांनी ‘आमच्या नादी लागू नका, असे म्हणत अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकीदेखील यात दिली आहे. हिम्मत असेल तर झोपडपट्टीत जा, तेथे आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड, असे आव्हान करून नीट राहायचे, ऊर्जामंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. एका मिनिटात सस्पेंड करून टाकेन,’ असेही आ. लोणीकर यात म्हणाले.
या सगळ्या प्रकारानंतर शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेली धमकी व वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेबद्दल डॉ. राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गुरुवारी थकीत बिल असल्याप्रकरणी महावितरण आमदार लोणीकर यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित करणार, अशी चर्चा सुरु होती. परंतु त्यापूर्वीच आमदार लोणीकर यांनी दोन्ही घरांचे थकीत वीज बिल भरले आहे.
अशी होती थकबाकी१. ग्राहक क्रमांक- ४९००१४८८९१०५ राहुल बबनराव यादव, हाऊस नं. ५२, गट नंबर १४६, अलोकनगर, औरंगाबाद पिन कोड- ४३०००१वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- १८ जानेवारी २०२१मार्च २२ अखेर एकूण थकबाकी होती- ३ लाख २१ हजार ४७०------२. ग्राहक क्रमांक- ४९००११००९२३६नाव- आय. एस. पाटीलपत्ता- प्लॉट नं. ५५, गट नं.१४६, अशोकनगरजवळ, सातारा, औरंगाबाद पिन कोड- ४३१००१वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- २७ मार्च २०१९मार्च २२ अखेर एकूण थकबाकी होती- ६७ हजार २०० रुपये.