जालना : दीड महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे कोमेजू लागलेल्या कपाशी पिकाला जीवदान मिळाले.जालना तालुक्यातील माळशेंद्रा, पीरपिंपळगाव, वंजारउम्रद, गोंदेगाव, घाणेवाडी, जामवाडी शिवारात सायंकाळी सातच्या सुमारास मध्यम पाऊस झाला. तसेच भोकरदन तालुक्यातील हसनाबाद, केदारखेडा परिसरात सायंकाळी सात वाजता पावसाने हजेरी लावली. गोषेगाव, खडकी, लतीफपूर, विटा, बोरगाव खडक, सिरसगाव, पंढरपूरवाडी, निमगाव, कुंभारी, नांजा, क्षिरसागर, रजाळा, खडकी, धावडा, पोखरी, भोरखेडा, वडोद तांगडा या परिसरातही पावसाने हजेरी लावली. अंबड तालुक्यातील शहागड, वडीगोद्री, वाळकेश्वर, झिरपी, शहापूर, सुखापुरी फाटा, धाकलगाव, वसंतनगर, रेवलगाव, बारसवाडा, सोनक पिंपळगाव परिसात सायंकाळी साडेसातनंतर पावसास सुरुवात झाली. तर परतूर शहरासह तालुक्यातील बामणी, मसला, वरफळ शिवारात रात्री आठच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. अर्धा तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी वाहिले. तर परिसरातील शेती पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. मंठा तालुक्यातील आर्डा, केंधळी, बरबडा, तळणी, नेलेखेडा, तळतोंडी, उस्वद परिसरात पावसाने हजेरी लावली. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव, तीर्र्थपुरी, रांजणी, पारडगाव शिवारात रिमझिम पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यात सर्वदूर रिमझिम पाऊस झाला. पावसाअभावी पिके सुकून गेली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. जिल्ह्याला आणखी जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.बदनापूर तालुक्यातही हजेरीबदनापूर शहरासह तालुक्यातील मालेवाडी, दाभाडी, सागरवाडी, अकोला नीकळक, गेवराई, शेलगाव इ. भागांत तासभर पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.
दीड महिन्यानंतर पाऊस परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:06 AM