शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

अखेर प्रवाशांच्या रेट्याने ‘सरकला’ जिना!

By admin | Published: August 24, 2016 12:28 AM

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनवरील बहुप्रतीक्षित एक्सलेटरच्या (सरकता जिना) सुविधेला अखेर मंगळवारपासून सुरुवात झाली. प्रवाशांच्या रेट्यामुळे कोणताही उद््घाटनाचा सोपस्कार

अभ्यासिकेचे बांधकाम : प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण विद्याथ्यांना मनपाकडून १० हजारांचे अनुदानचंद्रपूर : जिल्ह्यातून आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस या प्रशासकीय दर्जाचे अधिकारी तयार होण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने एक पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससीची तयारी करता यावी, याकरिता स्थानिक सिव्हिल लाईन परिसरात बाबा आमटे अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांकरिता मनपा नि:शुल्क उपलब्ध करीत आहे. अभ्यासिकेत अभ्यास करून युपीएससीची प्रीलिमरी (प्राथमिक परीक्षा) उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना चंद्रपूर मनपा १० हजार रुपयांचे अनुदान पुढील तयारीकरिता दिले जाणार आहे. महाराष्ट्रातून युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढविण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. त्यात विदर्भातील विद्यार्थी मागे राहू नये, याकरिता चंद्रपूर मनपाचे पुढाकार घेतला आहे. चंद्रपूरच्या वरोरा नाक्यापासून डावीकडे जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या पुढे बाबा आमटे अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येत आहे.चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी १ कोटी ८५ लाख रुपये किंमतीच्या अभ्यासिकेला प्रशासकीय मान्यता दिली. पुढील वर्षीपर्यंत या अभ्यासिकेचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. अभ्यासिका दुमजली असून तळमजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका राहील. तर त्यावर सभागृह तयार करून तेथे विद्यार्थ्यांना कोचिंगची सुविधा उपलब्ध केली जाईल. या अभ्यासिकेत २५ विद्यार्थ्यांकरिता टेबल, खुर्च्या राहणार आहेत.अभ्यासिकेते बांधकाम पूर्ण व्हायचे आहे. तत्पूर्वीच एका संस्थेने या अभ्यासिकेत पुस्तके व कोचिंगची सुविधा उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभ्यासिकेचे बांधकाम केल्यावर ती देखभालीकरिता मनपाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यानंतर मनपा कोणतेही शुल्क न आकारता ही अभ्यासिक संबंधीत संस्थेला चालविण्याकरिता देणार आहे.ही संस्था विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क घेऊन कोचिंगची सुविधा उपलब्ध करणार आहे. तसेच अभ्यासिकेत पुस्तके उपलब्ध करणे, गेस्ट लेक्चरचे आयोजन करणे आदी संस्थेमार्फत केले जाईल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांकरिता निवासाची सोय राहणार नाही. (प्रतिनिधी)मनपाचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनया अभ्यासिकेत अभ्यास करण्याकरिता विद्यार्थ्यांकडून मनपा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुस्तकेदेखील मोफत उपलब्ध केले जातील. जी संस्था विद्यार्थ्यांना कमी रकमेत कोचिंग करणार आहे, त्या संस्थेकडूनही मनपा अभ्यासिकेचे कोणत्याही प्रकारचे भाडे आकारणार नाही. एवढेच नव्हे तर युपीएससीची प्रीलिमरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षेची तयारी करण्याकरिता चंद्रपूर मनपा १० हजार रुपये अनुदान उमेदवारांना उपलब्ध करणार आहे.इमारतीचे बांधकाम सुरूसार्वजनिक बांधकाम विभागामतर्फे उपअभियंता उदय भोयर यांच्याकडे अभ्यासिकेचे बांधकाम सोपविण्यात आले आहे. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तेथील ग्रंथालयामध्ये दिवसभर अभ्यासाची सोय राहणार आहे. सभागृहातदेखील विद्यार्थ्यांना गैरसोय होऊ नये, अशी रचना करण्यात आली आहे. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सजावटीवर ११ लाख ३८ हजार आणि फर्निचरवर १३ लाख ३४ हजार रुपये खर्च करणार आहे.