लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. यावेळी एका नातेवाईकाने या डॉक्टरची चक्क कॉलर पकडली. तर वरिष्ठ डॉक्टरांवरही नातेवाईक धावून गेले. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी मास बंक आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभर तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.डॉ. हर्षद चव्हाण असे धक्काबुक्की झालेल्या निवासी डॉक्टराचे नाव आहे. मानेला जखम झाल्याने हर्षनगर येथील रहिवासी मधुकर चांदणे (५५) यांना बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी घाटीतील अपघात विभागात दाखल केले. यावेळी १५ ते २० नातेवाईकांनी रुग्णाभोवती गर्दी केली. गर्दी आणि उपचाराच्या कारणावरून नातेवाईक आणि निवासी डॉक्टरांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी गर्दी न करता मोजक्याच नातेवाईकांनी थांबण्याची सूचना करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या एका नातेवाईकाने डॉ. चव्हाण यांना धक्काबुक्की केली. यानंतर अन्य एका नातेवाईकाने हुज्जत घालून थेट डॉ. चव्हाण यांची कॉलर पकडली. या घटनेची माहिती मिळाल्याने सहयोगी प्रा. डॉ. सुरेश हरबडे हे अपघात विभागात पोहोचले. यावेळी एक नातेवाईक त्यांच्यावरही धावून गेला. कारण नसताना मारहाण व धक्काबुक्की केल्याचा आरोप करून निवासी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून मास बंक करीत काम बंद केले. यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आणि वरिष्ठ डॉक्टरांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पहाटे चारपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही.गुरुवारी अधिष्ठातांच्या कक्षात उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या उपस्थितीत निवासी डॉक्टरांची बैठक झाली मात्र तोडगा निघाला नाही.
औरंगाबाद येथे धक्काबुक्कीनंतर डॉक्टरांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:57 AM
घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. यावेळी एका नातेवाईकाने या डॉक्टरची चक्क कॉलर पकडली. तर वरिष्ठ डॉक्टरांवरही नातेवाईक धावून गेले. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी मास बंक आंदोलन पुकारले. आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभर तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
ठळक मुद्देघाटी रुग्णालय : रुग्णाच्या नातेवाईकाने पकडली निवासी डॉक्टरची कॉलर