शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

भावाच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनी बनावट मृत्युपत्र बनवले; कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न

By सुमित डोळे | Published: December 21, 2023 12:45 PM

सह्यांचे लेटरहेड चोरत सख्ख्या भावाची कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला, सात जणांच्या विरोधात गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : इलेक्ट्रिकल व्यावसायिक महेंद्र मदनलाल काला यांच्या मृत्यूनंतर सख्ख्या भावांनीच त्यांच्या सह्यांचे लेटरहेड चोरत त्यांची कोट्यवधींची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला. खोट्या स्वाक्षऱ्या करून तोंडी वाटणीचे स्मरणपत्रही तयार केले. कुटुंबाला हा प्रकार समजताच नरेंद्र मदनलाल काला, विजय मदनलाल काला, आदित्य विजय काला यांच्यासह सात जणांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महेंद्र यांच्या पत्नी अरुणा यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. महेंद्र यांची कस्तुम इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्याद्वारे ते शासकीय इलेक्ट्रिकलच्या कंत्राटाचा व्यवसाय करत. त्यांच्या सांगण्यावरून त्यांचे भाऊ त्यांना व्यवसायात मदत करत. १ नोव्हेंबर, २०१९ रोजी महेंद्र यांचे आजाराने निधन झाले. विजय भाऊच असल्याने अरुणा यांनी त्यांना व्यवसायाची सर्व कागदपत्रे, चाव्या सुपुर्द केल्या. २०२० मध्ये अरुणा यांनी न्यायालयात त्यांच्या तीन विवाहित मुलींच्या नावे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला. विजयने मात्र ते देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याच दरम्यान त्या हैदराबादला शस्त्रक्रियेसाठी गेल्या. त्याच वेळी त्यांच्या घरी चोरी झाली. यात दागिन्यासह महत्त्वाची कागदपत्रे व महेंद्र यांच्या सहीचे लेटरहेड चोरीला गेले. त्याच्या तीनच महिन्यांत विजय व आदित्यने अरुणा यांच्या संपत्तीच्या उत्तराधिकाऱ्याच्या अर्जावर न्यायालयात आक्षेप दाखल केला.

कंपनीच्या लेटरहेडवर मृत्यू प्रमाणपत्रआरोपींनी तोंडी वाटणीचे स्मरणपत्र सादर करत कस्तुम इंजिनिअर्सच्या लेटरहेडवर मृत्यू प्रमाणपत्र पाहून अरुणा व त्यांच्या मुलींना धक्काच बसला. मृत्युपत्रासोबत साक्षीदार म्हणून जितेंद्र छाबडा, सचिन अग्रवाल व गजानन संगवार (तिघेही रा. वाशिम) यांना दाखवण्यात आले. मृत्युपत्रात मृत्यूच्या ११ महिन्यांनंतर विजय व आदित्यला प्रमाणपत्र देण्यात यावे, असे नमूद केले. खासगी हस्ताक्षरतज्ज्ञांच्या तपासणीत सर्व हस्ताक्षर व अक्षरे खोटी सिद्ध झाली. असे करून आरोपींनी वाशिम येथील ६ एकर ३ गुंठे जमीन, टिळकनगरमधील ३३४.४ चौ.मी. आकाराचा राहता बंगला व तिसगाव येथील ४९३.४० चौ.मी. आकाराचा प्लाॅट हडपण्याचा प्रयत्न केला. निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी