औरंगाबाद: आमच्या उठावामुळे ठाकरे कुटुंबाला मोठा फायदा झाला. उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील बेल्ट गेला, ते सरळ उभे राहू लागले. आदित्य, तेजस, रश्मी ताई घराबाहेर आल्या. यांना असा कोणता डॉक्टर भेटला की सारे आजारच पळाले, असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी आज उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच आपल्या ग्रामीण शैलीत माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या टीकेचा देखील भुमरे यांनी खरपूस समाचार घेतला.
औरंगाबादच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचा सत्कार सोहळा आणि हिंदू गर्जना मेळावा आज संत एकनाथ रंगमंदिरात झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मंत्री संदीपान भुमरे यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. आपल्या ग्रामीण शैलीत उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यावर भुमरे यांनी जोरदार टीका करत आम्ही का उठाव केला याच्या कारणांचा पाढाच वाचून दाखवला. भूमरेंच्या ग्रामीण भाषेतील भाषणाला टाळ्या आणि हास्याने चांगलीच दाद मिळाली
ठाकरेंना असा कोणता डॉक्टर मिळाला एकनाथ शिंदे यांच्यामुळे उध्दव ठाकरे यांचे आजार दूर झाले, गळ्याचा पट्टा गेला. सरळ उभे राहिले, उध्दव साहेब बाहेर आले आदित्य आणि तेजस बाहेर आला, रश्मी ताई बाहेर आल्या. एकनाथ शिंदे यांच्यामुळे घरातील आजार गेले किती फायदा झाला त्यांचा. ठाकरे यांनी अपक्ष आमदाराला सोबत घेतले, मंत्रिपद, पालकमंत्री पद दिले. यासाठी त्यांनी किती खोके घेतले. खरे गद्दार तर मातोश्रीवर आहेत.
खैरेंना किंमत आली आज आमच्यावर टीका करणारे खैरे तेव्हा म्हणायचे मातोश्री खूप वाईट आहे. मी नेता असूनही मला प्रवेश बंद आहे. मात्र, आमच्या उठवानंतर आता त्यांना किंमत आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी जिल्ह्यातील आमदारांसोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही खैरेंनी २० लाख रुपये घेतले. त्यांना लोकभेत कोणी पाडले आधी याचा विचार करावा.
दानवेंनी निवडणूक लढवावी सभा आम्ही घेयाच्या पण त्याचे फोटो उद्धव ठाकरेंना दाखवून अंबादास दानवे त्याचे श्रेय घेत. आम्ही पैसे दिले, गाड्या लावल्या, माणस आणली आणि नाव यांचं झाल. त्याने खासदारकी, आमदारकी लढवावी. खैरे आणि दानवेत बाईट देण्याची स्पर्धाच लागली आहे.