शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

अखेर तीन वर्षांनंतर पालकमंत्र्यांची उचलबांगडी करण्यात चंद्रकांत खैरे गटाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 9:51 PM

: शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद : शिवसेना नेते तथा पालकमंत्री रामदास कदम यांची तीन वर्षांनंतर उचलबांगडी करण्यात खा. चंद्रकांत खैरे गटाला यश आले आहे. शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकारण खा. खैरे यांच्याशिवाय होणे अशक्य असल्याचेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. ८ जानेवारी २०१५ ते १७ जानेवारी २०१८ पर्यंत या तीन वर्षांत कदम आणि खा. खैरे यांच्यात धोरणात्मक वादासह संघटना आणि विकासकामांच्या विविध योजनांवरून वाद झाले. तीन वर्षांत झालेल्या या वादामुळे पक्षात दोन गट पडले. ही उचलबांगडी गटबाजीतून अथवा वादातून झाल्याचे दिसून येऊ नये म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याची गुलाबराव पाटील, नांदेडची रामदास कदम, तर औरंगाबादची डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून तसे परिपत्रकदेखील जारी झाले आहे. पालकमंत्री म्हणून पहिल्याच बैठकीत कदम यांनी समांतर जलवाहिनीच्या योजनेवर बोट ठेवले. ही योजना शहरासाठी घातक असल्याचा आरोप करीत मनपातील शहर अभियंता, आयुक्तांवर शरसंधान करीत खा. खैरे यांचे आर्थिक बलस्थान कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू केला. येथूनच नाराजीचा सुरू झालेला हा प्रवास पुढे अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजत राहिला. मीच नेता आहे, दुसरे कुणीही नाही, असे बोलून कदम यांनी खैरे यांना डिवचले. मनपातील पदांचे निर्णय, जिल्हा नियोजन समितीत घेतलेल्या निर्णयांमुळे खैरेंसह त्यांच्या गटातील खदखद वाढत गेली. पालकमंत्र्यांनी काही विशिष्ट समुदायाचे नगरसेवक जवळ केल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर उमटत राहिला. परिणामी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांचेही पालकमंत्र्यांसोबत कधीही जमले नाही. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाºयांनी कदम यांच्यांशी जवळीक केली. त्या पदाधिकाºयांना पालकमंत्री बदलल्याचे पचनी पडलेले नाही. खा. खैरेंसोबत ज्यांचे वाद झाले, ते सर्व कदमांच्या जवळ गेले. आता कदमांची उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांची लवकरच उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत.तीन वर्षे गाजले वादग्रस्त वक्तव्यांनीऔरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, या शिवसेनेच्या राजकीय धोरणात्मक मुद्यावरून खैरे आणि कदम यांच्यात दोन टोकांची वक्तव्ये पुढे आली. त्यामुळे सोशल मीडियात वेगळे पडसाद उमटले. समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत खा. खैरे दक्षता समितीच्या बैठकीत सकारात्मक भूमिका घेत गेले, तर कदम यांनी ती योजना घातक असल्याचे सांगून महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त डी.एम. मुगळीकर यांच्यावर टीका केली. पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली वक्तव्ये पक्षासाठी घरचा अहेर असल्याप्रमाणे आहेत, असे खा. खैरे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाºयांनी मातोश्रीवर वारंवार सांगितले; परंतु त्यावर निर्णय होण्यास तीन वर्षे लागली. तीन वर्षे खा. खैरे आणि कदम यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यांनी गाजले.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेRamdas Kadamरामदास कदम