शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

अथक संघर्षानंतर आमदारकी

By admin | Published: October 22, 2014 12:21 AM

औरंगाबाद : भाऊबंदकी संपली आणि त्याचे फळ घरात आमदारकी येण्यात झाले.

औरंगाबाद : भाऊबंदकी संपली आणि त्याचे फळ घरात आमदारकी येण्यात झाले. वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार भाऊसाहेब पाटील चिकाटगावकर यांच्या विजयाचे असेच वर्णन करावे लागेल. तब्बल १० वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी जिद्दीने आमदारकी मिळविलीच. कैलास पाटील यांच्यानंतर चिकटगावकर हे नाव सुमारे २० वर्षांनी विधानसभेत उच्चारले जाणार आहे. तात्या या नावानेही परिचित असलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर हे नाव विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांपासून संपूर्ण मराठवाड्यात परिचित आहे. २००४ सालच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली. १९९९ मध्ये, तर केवळ १,२२५ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र, भाऊसाहेब पाटील यांनी जिद्द सोडली नाही. शेवटी ज्यांनी त्यांना दोन वेळा पराभूत केले त्या आर.एम. वाणी यांचा पराभव करूनच ते निवडून आले. चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक महत्त्वाचे राजकीय घराणे आहे. या घरातील कैलास पाटील चिकटगावकर हे वैजापूरचे आमदार राहिले आहेत. कैलासआबा आणि भाऊसाहेब पाटील यांच्यात राजकीय स्पर्धा सुरू झाल्यानंतर मात्र दोघांनाही आमदारकी मिळविण्यात अपयशच आले. दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने ‘दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ’ अशी या बंधूंची अवस्था झाली होती. यंदा मात्र कैलासआबांनी सामंजस्य दाखवून भाऊबंदकी संपविली. धाकटे बंधू भाऊसाहेब पाटील यांना पाठिंबा दिला. राज्यात नरेंद्र मोदी यांनी घेतलेला सभांचा धडाका वैजापूरमध्ये मात्र चिकटगावकर यांना फायदेशीर ठरला. चिकटगाव हे वैजापूर तालुक्यातील भाऊसाहेब आणि कैलास पाटील यांचे गाव. या घराण्याचे मूळ नाव निकम. मात्र, चिकटगावकर हे नाव मराठवाडाभर आणि कैलास पाटील यांच्यामुळे विधिमंडळातही गेले. भाऊसाहेब आणि कैलासआबा हे पाथ्रीचे माजी आमदार दिगंबरराव वडीकर यांचे जावई. वडीकर यांच्या दोन मुली या चिकटगावकर बंधूंना देण्यात आल्या. भाऊसाहेब यांच्या पत्नी विजयाताई जि.प.च्या उपाध्यक्षाही होत्या. भाऊसाहेब हे जिद्दी आणि आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. दोन वेळा पराभव होऊनही त्यांनी हार मानली नाही. वैजापूरच्या राजकारणावर कायम आपला ठसा राहील याची काळजी घेतली. भाऊसाहेब पाटील १९९० ते १९९५ या काळात वैजापूरचे नगरसेवक होते. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी वैजापूर फेस्टिव्हल, उर्स कमिटीमार्फत कव्वाली व संदलचे आयोजन अशा सामाजिक कार्याबरोबरच आर्थिक अडचणीमुळे वैद्यकीय शिक्षण धोक्यात आलेल्या एका विद्यार्थिनीला त्यांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत दत्तकही घेतले होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी पंचायत समिती ताब्यात घेतली. जिल्हा परिषदेत पक्षाचे तालुक्यातून तीन सदस्य निवडून आणले. वैजापूर नगर परिषद काँग्रेसच्या ताब्यात असली तरी तेथेही तीन सदस्य, असे बळ आहे. आमदार म्हणून निवडून आल्याने आता वैजापूर तालुक्यावर त्यांची घट्ट पकड निर्माण झाली आहे. फेसबुकवरही प्रचारभाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे फेसबुक पेजदेखील आहे. निवडणुकीच्या काळात त्यांनी त्यावर आपल्या कामाच्या तसेच निवडून देण्यासंबंधीच्या पोस्ट टाकल्या आहेत. पेजला तीन हजारांपेक्षा अधिक ‘लाइक्स’ आहेत. फेसबुकवरून १ लाख २१ हजार १११ मतांचे ‘मिशन’ ठेवलेल्या भाऊसाहेब यांनी मोठी मते मिळविली नसली तरी पराभवाची हॅट्ट्रिक चुकविली.