लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत. कचराकोंडी फोडण्यात पालिकेला सपशेल अपयश आलेले आहे. त्यातच आता पाणी प्रश्न नागरिकांना छळणार हे निश्चित. पाणी द्या पाणी म्हणून उद्या महापालिकेवर नागरिकांची शिष्टमंडळे, धरणे, निदर्शने आणि मोर्चे धडकल्यावर नवल वाटायला नको.१६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्याची प्रक्रिया बंद आहे. खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेला कचरा प्रश्नात समाधानकारक असा दिलासा मिळाला नाही. कचºयावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर उरला आहे. त्यावरही त्वरित निर्णय घेण्यास पालिका तयार नाही. निविदा प्रक्रियेने यंत्र खरेदी, मग जागांचा शोध सुरू होईल. चिकलठाण्यातील केंद्रीय कचरा प्रकल्पाची तर अजून निविदाही निघाली नाही. आणखी दोन ते तीन महिने औरंगाबादकरांना कचºयातच दिवस काढावे लागणार हे अटळ आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने मागील महिन्यात आयुक्तांचीही उचलबांगडी केली. पालिकेला प्रभारी आयुक्त देण्यात आले. त्यानंतरही कचरा प्रश्नात किंचितही प्रगती झालेली नाही.एकीकडे नागरिक कचरा समस्येने आधीच त्रस्त असताना आता पाणी प्रश्नाने अधिक बेजार करून ठेवले आहे. तापमान अजून ३८ अंश सेल्सिअसपर्यंत असताना दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानाने ४० शी ओलांडल्यावर तर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होणार आहे. सध्या मनपाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यंत असमाधानकारक आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक पाणीपुरवठ्याचे टप्पे करून ठेवण्यात आले आहेत. एखाद्या लाईनला चार तास, तर दुसºयाला लाईनला अर्धा तास पाणी देण्याची किमया पाणीपुरवठा विभागाचे लाईनमन करतात. या लाईनमनवर महापालिकेचा कुठलाच अंकुश नाही. लाईनमन महाशय कोणत्या वेळी आणि किती पाणी द्यायचे हे ठरवितात. काही वसाहतींमध्ये तर पाणी जास्त मिळावे म्हणून लाईनमन कर्मचाºयांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येतात. या आमिषांना हे कर्मचारी बळी पडतात.म्हणे चार दिवसांआड पाणी देणार...मनपा प्रशासनाने पाणी प्रश्नावर एक तातडीची बैठक घेऊन शहरातील प्रत्येक वसाहतीला चार दिवसांआड पाणी द्या, असे आदेश दिले. या आदेशाची किंचितही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ज्या वसाहतींना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे, त्या भागातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता. या आनंदावर पाणी फेरण्याचे कामही मनपा प्रशासनच करीत आहे.
कचऱ्यानंतर आता औरंगाबादकरांचा पाण्यासाठी छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 11:57 PM
शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत.
ठळक मुद्देमहापालिका : पाण्याची मागणी वाढली; नियोजनाचा अभाव