हिंगोली : गोरेगाव येथील दडगफेकीच्या प्रकारानंतर तेथे अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक पी.बी. मगरे यांनी भेट दिली. पाहणीनंतर नागरिकांचे समुपदेशन केल्याने हा प्रकार बंद झाला.गोरेगाव येथील दगडफेकीच्या प्रकाराबाबत तेथील नागरिकांच्या मुलाखती घेतल्यानंतर हा प्रकार का व कशामुळे घडत आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तेथील नागरिकांचे समुपदेशन केले. कोणतीही वस्तू बल दिल्याशिवाय जागची हलणे शक्य नाही. शिवाय हा प्रकार आटोक्यात आलाच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रयोग केल्यास तात्काळ खोडसाळपणा समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर या भागातील नागरिकांच्या मुलाखतीही घेतल्या. हा प्रकार नेमका कशामुळे घडतोय, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी समुपदेशन केले. त्यामुळे आता गोरेगावात दगडफेकीच्या प्रकारावर नियंत्रण आले. पोलिसांनी मात्र या प्रकारातून अंग काढून घेतले होते. त्यामुळेच अंद्धश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांना तेथे जाण्याची वेळ आली होती. (जिल्हा प्रतिनिधी)
अंनिसच्या भेटीनंतर दगडफेकीवर नियंत्रण
By admin | Published: February 16, 2016 11:33 PM