छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सोयगाव आगार, सिल्लोड आगार व कन्नड आगाराची वाहतूक काही प्रमाणात सुरू आहे. तर इतर सर्व आगाराची वाहतूक ही पोलिसांच्या सूचनेनुसार बंद आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली.
शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शहरातून विविध शहरात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे. बस कधी सुटणार, अशी विचारणा प्रवाशांकडून होत होते आहे. पोलिसांच्या सुचनेनंतरच बससेवा सुरळीत होईल, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातील चालक- वाहक बस वाहतूक बंद असल्याने आगारात आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था स्थानिक अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केली.
खाजगी वाहतूकदारांची मनमानीसुरक्षेच्या दृष्टीने बस वाहतूक बंद आहे. बस वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशी खोळंबले आहेत. यातच खाजगी वाहतुकदारांनी मनमानीकरत प्रचंड भाडेवाढ केली आहे. पुण्यासाठी ५०० रुपये तर पैठणसाठी १५० रुपये दर खाजगी वाहतूकदार आकारत असल्याची माहिती आहे.
हिरकणी बस जाळलीमध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी रात्री एक हिरकणी बस जळल्याची घटना घडली. आग नेकमी कशी लागकी, हे कळू शकले नाही.