औरंगाबाद: मित्रांना भेटण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वार मुलांना पाठीमागून वेगात आलेल्या कारने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक मुलगा जागीच ठार झाला. तर दुसऱ्या मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा भीषण अपघात बुधवारी (दि.१५)दुपारी दिड ते पावणे दोन वाजेच्या सुमारास बायपासवरील एमआयटी कॉलेजजवळ झाला.
अतुल अरूण हतागळे(वय १५,) असे मृत मुलाचे नाव आहे. तर त्याचा नातेवाईक आणि मित्र आदित्य खैसाराम अडागळे (वय १५,रा. दोघेही रा. संतज्ञानेश्वरनगर, सातारा परिसर) असे गंभीर जखमीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार अतुल आणि आदित्य हे दोघे मित्र असून परस्परांचे नातेवाईक होते. अतुल आणि आदित्य दोघे बुधवारी दुपारी मोटारसायकलने महानुभाव आश्रम चौकाकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने त्यांना उडविले. यामुळे त्यांची दुचाकी शेजारून जाणाऱ्या ट्रक धडकून विरूद्ध दिशेने येणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या लेनवर जाऊन पडली आणि अतुल आणि आदित्य रस्त्यावर जोराने आदळून रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
यात अतुलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना उडविणारा चालक कारसह तेथून पसार झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकां पैकी सोमनाथ गवंडर या तरूणाने रिक्षा थांबविली. आणि त्याने स्वत: जखमी आदित्यला रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड काँन्स्टेबलप आसाराम मरकड आणि पोलीस कॉन्स्टेबल चंपालाल डेडवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.