हिंगोली : जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुकन्या योजनेत पुन्हा सर्वे करण्याचा आदेश दिल्याने या विभागाने पर्यवेक्षिकांना सूचना देवून कामाला लावले आहे.या योजनेत यापूर्वी २0१४ मध्ये आघाडी शासनाच्या काळात १८00 मुलींची माहिती नोंदविली गेली होती. यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे शासन १८ हजार रुपयांची ठेव जमा करणार असून मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर एक लाख रुपये मिळणार असल्याची ही योजना आहे. मात्र मध्यंतरी ही योजना ठप्पच पडली होती. ती पुन्हा सुरू झाली असून आता यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील फक्त दोन मुलींपर्यंत ती लागू असेल. वडील मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असावे, बालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, योजनेचा लाभ घेताना मुलगी १८ वर्षांची, अविवाहित व दहावी उत्तीर्ण असावी, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळ्या मुली झाल्यास त्या योजनेस पात्र राहतील, 0 ते६ वर्षे वयोगटातील अनाथ मुलगी दत्तक घेतल्यास अथवा बालगृहातील अनाथ मुलीस लाभ मिळणार आहे. यात दुसऱ्या मुलीचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मात्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पुन्हा ‘सुकन्या’चा सर्वे
By admin | Published: March 20, 2016 11:21 PM