शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

बँकेसमोर शेतकºयांच्या पुन्हा रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:43 AM

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ मध्ये कर्जमाफीचे अर्ज भरुन देण्यासाठी तब्बल ८३४ केंद्रावर ४५१ बायोमॅट्रीक मशीनचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड क्रमांक मिळविण्यासाठी बँकेसमोर रांगा लावत आहेत. कर्जमाफीसाठी तो आवश्यक असल्याचे सांगितले जाते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७ शेतकºयांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यात ६६0२५ जणांवर ३६२.४0 कोटींची थकबाकी आहे. तर २०१६ मध्ये नियमित व्यवहार करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांना ओ. टी. एस. करता येणार आहे. यात १0६८७ शेतकºयांवर २९२.९४ कोटी कर्ज आहे. कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डचा खाते क्रमांक गरजेचा असल्याने सोमवारी तर शेतकºयांनी बँकेसमोर पहाटे सहा वाजल्यापासून लांबलचक रांगा लावल्या होत्या. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी अर्ज भरण्यासाठी विविध केंद्रांवर एकच गर्दी करीत आहेत. अद्यापपर्यंत ७९ हजार ३५७ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर ६२ हजार ३५८ शेतकºयांचे अर्ज सादर झाले आहेत. त्या- त्या थकबाकीदार शेतकºयांचे अर्जांची तपासणी संबंधित बँकेकडून करणे सुरू आहे. अर्ज केलेला शेतकरी निकषात बसतो की नाही, कोणत्या अटी-शर्तीत बसतो. बसत असेल तरच सदरील शेतकºयाचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जात आहे. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत प्राथमिक छाननी होईल. त्यानंतर १६ सप्टेंंबर रोजी तालुकास्तरावर समिती व बँकेचे अधिकारी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करतील. त्यात पात्र शेतकरीच पुढे कर्जमाफीच्या कसोटीवर उतरतील. मात्र संपूर्ण महाराष्टÑात अर्ज भरण्यासाठी एकच वेबसाईट उपलब्ध असल्याने दोन- दोन दिवस वेबसाईटच उघडत नाही. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत कर्जमाफीचे अर्ज भरले जातील का? असा सवाल शेतकºयांतून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे १ आॅक्टोबर रोजी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने अर्ज भरण्याचे काम करावे लागणार आहे. तर बंद असलेले केंद्रही सुरु केल्यास शेतकºयांना लाभ मिळण्यास मदत होईल. आजघडीला रात्री अपरात्री विविध केंद्रावर अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. तर केंद्रावर पैसे घेत असल्याच्या होत असलेल्या चर्चेची ही बारकाईने तपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबधंक म्हेत्रेवार यांनी सांगितले.