औरंगाबाद : स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आता डेंग्यूचीही लक्षणे दिसत आहेत. यातून उपचाराची दिशा ठरविणे अवघड होत आहे. स्वाईन फ्लूमुळे वैद्यकीय शास्त्रासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आहे. या व्हायरसला एच १ व एन १ या नावाने ओळखले जाते. स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांद्वारे इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. रुग्णाचा खोकला, शिंक यातूनही संपर्कातील व्यक्तीला स्वाईन फ्लूची लागण होते. तर एडिस नावाचा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालत असल्याने त्याची झपाट्याने पैदास होते. त्यामुळे डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी पाणी जास्त दिवस साठवून राहणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.या दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला ताप येणे हे प्रमुख लक्षण आहे. परंतु उर्वरित लक्षणे मात्र, भिन्न आहेत. स्वाईन फ्लूमध्ये सर्दी, पडसे, श्वास घेण्यास त्रास होतो. डेंग्यूमध्ये रुग्णांत डोकेदुखी, सांधे, अंग दुखणे, डोळ्यामागे वेदना, अशी लक्षणे असतात. डेंग्यूमध्ये प्लेटलेटचेही प्रमाण कमी होते.औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचे रुग्ण समोर येत आहेत. आजघडीला घाटीत एक आणि खाजगी रुग्णालयांत ७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १० संशयित रुग्णांवर उपचार चालू आहेत. स्वाईन फ्लूच्या काही रुग्णांमध्ये ताप, सर्दी, पडसे यासह प्लेटलेट कमी होत असल्याची नोंद आरोग्य उपसंचालक कार्यालयाने घेतली आहे. यामुळे रुग्ण हा स्वाईन फ्लूचा आहे की, डेंग्यूचा असा संभ्रम निर्माण होत आहे. रुग्ण हा स्वाईन फ्लू आहे का, हे पाहण्यासाठी तपासणीसाठीचा नमुना पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी’ला (एनआयव्ही) पाठविला जातो. या संस्थेकडून मिळणाऱ्या अहवालानंतर आजाराचे निदान होते. ही सगळी प्रक्रिया होईपर्यंत रुग्णांवर आवश्यक ते उपचार केले जातात. परंतु दोन्ही आजारांच्या एकत्रित लक्षणामुळे आरोग्य विभागाकडून खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.काय आहेत कारणे...१) स्वाईन फ्लू या रोगाचे जंतू हवेतून मानवी शरीरात श्वासाद्वारे प्रवेश करतात. तर डेंग्यू हा डासांमार्फत होतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला एकाच वेळी दोन्ही संसर्ग होण्याचा धोका असतो.२) प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध आणि इतर आजारी असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लू, डेंग्यूची एकत्रित बाधा होण्याची शक्यता असते.३) एका आजाराची लक्षणे असताना उपचाराकडे दुर्लक्ष केल्यास दुसºया आजाराची लागण होण्याची शक्यता असते. शिवाय ताप आल्यानंतर रक्त पातळ करणाºया गोळ्या खाणे, हेदेखील कारणीभूत ठरू शकते.एकत्रित संसर्गस्वाईन फ्लू रुग्णांमध्ये स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचा एकत्रित संसर्ग आढळून येत आहे. डेंग्यूच्या रुग्णांत ज्याप्रकारे प्लेटलेट होतात, तशाच स्वाईन फ्लूच्या रुग्णांत आढळून येतात. वैद्यकीय शास्त्रासाठी हे आव्हानात्मक आहे. ताप आलेला असेल तर रक्त पातळ करणाºया गोळ्या घेता कामा नये.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
दोन आजारांचे एकत्रीकरण : स्वाईन फ्लूबरोबर रुग्णांमध्ये आता डेंग्यूचीही लक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 8:32 PM
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आता डेंग्यूचीही लक्षणे दिसत आहेत. यातून उपचाराची दिशा ठरविणे अवघड होत आहे. स्वाईन फ्लूमुळे वैद्यकीय शास्त्रासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.
ठळक मुद्देस्वाईन फ्लूने उभे केले नवे आव्हान