लोकमत न्यूज नेटवर्कउमरी: हैदराबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी शुक्रवारी सकाळी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत उमरी रेल्वेस्थानक व परिसराची पाहणी केली. येथून धावणाºया रिकाम्या एक्स्प्रेस रेल्वेला प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी थांबा देण्याबाबत त्यांनी सहमती दर्शविली.याप्रसंगी उमरी रेल्वे संघर्ष समिती व शहरातील नागरिकांच्या वतीने अरुणकुमार जैन यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. उमरी स्थानकात बोळसा स्थानकाच्या दिशेने १६ मीटर लांबीचे टिनशेड पदपाथ, नांदेड- बासर डेमो रेल्वेगाडी याबाबत पूर्वी दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून दिली असता यावेळी निश्चितच विचार करुन रेल्वे प्रशासन सेवा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रिकाम्या धावणाºया विशाखापट्टनम, संबलपूर, नगरसोल, नरसापूर, अमरावती-तिरुपती, सिकंदराबाद-जयपूर या एक्स्प्रेस गाड्यांना उमरी स्थानकात अंशत: तांत्रिक स्वरुपात तीन महिन्यांसाठी थांबा देण्याबद्दल त्यांनी सहमती दर्शवली.याप्रसंगी हैदराबाद रेल्वे डिव्हीजनला नव्याने नियुक्त झालेले वरिष्ठ अधिकारी श्रीधर, डीओएम कृष्णनायक, एडीएन रामू, आय़डब्ल्यू रमना, टी़आय़सुब्रमण्यम, सीसीआय गिरिराज सिंह, जी़ आय़ सरोजकुमार, आरपीएफचे उपनिरीक्षक के. शंकर, आरपीएफ लक्ष्मीकांत कुलकर्णी, उमरी रेल्वेस्थानकचे अधीक्षक भरतलाल मिना, स्टेशन मास्तर रमेशचंद्र मिना, बुकींग क्लर्क रामधन, पीडब्ल्यूआय श्रीनिवास राधेश्याम, उमरी रेल्वे संघर्ष समितीचे गजानन श्रीरामवार, आनंद दर्डा, रविकांत देशपांडे, माजी नगरसेवक एजाजखान, लक्ष्मण पाटील तुराटीकर, प्रल्हाद हिवराळे, विद्या अग्रवाल, ज्ञानेश्वर लोहगावे, प्रल्हाद वारले आदी उपस्थित होते.
उमरी येथे एक्स्प्रेस रेल्वेला तीन महिन्यांसाठी थांबा देण्यास सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 12:16 AM