लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतूर तालुक्यातील आष्टी येथे श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत कृषी माल प्रक्रिया उद्योग वसाहत उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याच्या कृषी उत्पादनास चालना मिळणार आहे.रुरबन अभियानाच्या शिखर परिषदेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या योजनेचा आढावा घेतला. बैठकीस परभणीचे खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधंळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा यांची प्रमुख उपस्थिती होती.रुरबन अभियानांतर्गत देशात १००, तर महाराष्ट्रात सहा क्लस्टर उभारण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील १६ गावांच्या विकासासाठी रुरबन योजनेतून १८५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. शेती पिकातून विविध उत्पादने तयार करुन त्यावर प्रक्रिया करणारे छोटे उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. टोमॅटो, केळी, बटाटे, सोयाबीन या पिकांचे या भागात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. या पिकांपासून (पान २ वर)
आष्टीत साकारणार कृषी प्रक्रिया उद्योग वसाहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:17 AM