१ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी राज्यात विविध कृषी विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर खुलताबाद कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत शेतकरी मेळावे, शिवारफेऱ्या, गावबैठका, शेतीशाळा, प्रशिक्षणे, परिसंवाद, कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील पीकस्पर्धा विजेते, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रयोगशील व उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहभागाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्त्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर देऊन प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी विजय नरवडे, मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार यांनी सांगितले. यावेळी कृषी पर्यवेक्षक गंगाराम मुंडे, कृषीसहायक जी. व्ही. गिराम, सरपंच ज्ञानेश्वर दुधारे, शेतकरी पोपट निमरोट, संतोष बोडखे, संजय बोडखे, कल्याण निमरोट, विजय काळे, विलास बोडखे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो : चिंचोली येथे कृषीसंजीवनी मोहिमेदरम्यान कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी.
210621\img-20210621-wa0092.jpg
चिचोली येथे कृषि संजीवनी मोहिमेत शेतकऱ्यांना माहिती देताना खुलताबाद येथील कृषी अधिकारी
छायाचित्र दिलीप मिसाळ