शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दीडपट पावसामुळे शेती पाण्यात; तब्बल ४ लाख हेक्टरवर पिकांचा चिखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 1:22 PM

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  

ठळक मुद्दे १९२ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल झाला असून, शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे पाठविला असून, शेतकऱ्यांना सुमारे १९२ कोटी रुपयांची मदत लागेल, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा खरीप हंगामाचे जिल्ह्यातील क्षेत्र सहा लाख ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे.  भात, ज्वारी, बाजरी, मका मिळून १ लाख ९९ हजार हेक्टर, तूर, मूग, उडीद हे कडधान्य मिळून ४८ हजार हेक्टर, भुईमूग, तीळ, कारळ, सूर्यफूल, सोयाबीन २ लाख हेक्टरवर, तर  ३ लाख ९९ हजार हेक्टरवर कापूस आणि ३ हजार ६५२ हेक्टवर ऊस होता. सुमारे ७० टक्के पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ७ जून ते २३ ऑक्टोबरपर्यंत सरासरीच्या तुलनेने ५५ टक्के अधिक पाऊस  झाला. औरंगाबाद तालुका २०० टक्के पाऊस होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वर्षीच्या सरासरीइतकीच पावसाची नोंद यंदा झाली होती. औरंगाबाद तालुका १९४ टक्के, फुलंब्री १३० टक्के,  पैठण १८० टक्के, सिल्लोड १६० टक्के, सोयगाव १४२ टक्के, कन्नड १३५ टक्के, वैजापूर १८६ टक्के, गंगापूर १६७ टक्के, खुलताबादमध्ये १२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

दीडपट पावसामुळे नुकसान१५५ टक्क्यांच्या आसपास पूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ६६० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. आजवर १०५१ मि.मी. पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी २२ ऑक्टोबरपर्यंत १०४५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. पावसाचे हे प्रमाण पाहता जिल्ह्यातील खरीप हंगामातील कापूस आणि कडधान्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी