लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला मिळालेल्या निधीचे २००८ पासून लेखा परीक्षणच करण्यात आले नसून या ९ वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची अनियमितता झाली असल्याचा आरोप भाजपाचे नेते तथा माजी आ.विजय गव्हाणे यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला.परभणीत येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी आ.विजय गव्हाणे म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला विविध विभागांच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे दरवर्षी नियमित लेखा परीक्षण करणे आवश्यक आहे. परंतु, २००८ पासून आतापर्यंत कृषी विद्यापीठाने लेखा परीक्षणच केलेले नाही. या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा अनियमित व्यवहार झाला आहे. कंत्राटदारीने कामे देत असताना ज्या गावचा अधिकारी कृषी विद्यापीठात प्रमुख पदावर आहे, त्याच गावातील व्यक्तीला नियम डावलून कंत्राट दिले जाते.
कृषी विद्यापीठाने ९ वर्षापासून लेखा परीक्षणाला दिला खो
By admin | Published: July 14, 2017 12:12 AM