औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुसज्ज कार्गो कॉम्प्लेक्समधून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला अखेर १ जूनपासन सुरुवात करण्यात येत आहे. उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी विमानतळावरील एअर कार्गोची सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्गो सेवेचा प्रारंभ करण्यासाठी प्राधिकरणास ब्युरो आॅफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीकडून मंगळवारी विमानतळ प्राधिकरणास सुरक्षेसंदर्भात मंजुरीचे पत्र प्राप्त झाले. प्राधिकरणाने तात्काळ पावले उचलत बुधवारपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय उत्पादन शुल्क व सीमा शुल्क परिषदेने चिकलठाणा विमानतळाचा आपल्या मानांकन यादीत समावेश केला. त्यामुळे चिकलठाणा विमानतळ देशातील १९ वे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले. त्यामुळे एअर कार्गोची सुविधा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यासाठी जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रूपांतर करण्यात आले असल्याचे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले. एक ाच छताखाली यंत्रणाआजघडीला विमान कंपन्यांकडून मालाची ने-आण केली जाते. त्यासाठी विमान कंपन्यांची स्वत:ची तपासणी यंत्रणा आहे. यापुढे विमानतळावरील कार्गो कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून मालाची तपासणी होईल. वेगवेगळी यंत्रणा वापरण्यापेक्षा एकाच ठिकाणी हे काम होण्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखेर आजपासून एअर कार्गो सेवा
By admin | Published: June 01, 2016 12:03 AM