शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘डीसीसी’च्या उर्जितावस्थेसाठी हवा शासनाचा पुढाकार

By admin | Published: May 12, 2017 11:46 PM

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा बँक विविध कारणांनी अडचणीत आली आहे़ अडचणीत आलेल्या या बँकेला उर्जितावस्था देण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले आहेत. आता खऱ्या अर्थाने या बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आली आहे़ इतर बँकांप्रमाणे या बँकेलाही आर्थिक मदतीचा हात देतानाच थकीत कर्ज वसुलीत समन्वयक म्हणून शासनाने भूमिका पार पाडल्यास शेतकऱ्यांची रक्तवाहीनी असलेल्या या बँकेला पुन्हा एकदा गतवैभव मिळू शकते.आरबीआयच्या सूचनेनुसार बँकेने अटींची पूर्तता केली आहे़ असे असले तरी आर्थिक अडचणीत असलेल्या बँकेतील चलन तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे़ मे २०१२ मध्ये आरबीआयने नवीन ठेवी स्विकारू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत़ तर दुसरीकडे कारखान्यांसह इतर कर्जे थकल्याने आर्थिक घडी कोलमडली आहे़ बँकेने अल्पव्याजाने किंवा बिनव्याजी २०० कोटी रूपये निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे़ हा निधी उपलब्ध झाला तर बँकेची आर्थिक घडी पूर्ववत होणार आहे़ याशिवाय बँकेने वसूल भागभांडवलाच्या २५ टक्के प्रमाणे राज्य शासनाकडे १५़४४ कोटींचा प्रस्ताव सहकार आयुक्तांच्या शिफारशीनुसार पाठविला आहे़ या प्रस्तावालाही मंजुुरी मिळणे गरजेचे आहे़तीन सहकारी साखर कारखान्यांना शासन थकहमी अंतर्गत कर्जाचे वाटप झाले आहे़ शासनाने ७०़७४ कोटी कर्ज वाटपास थकहमी दिली होती़ मार्च १७ अखेर एकूण १५८़९२ कोटी रक्कम येणे बाकी आहे़ ही कर्जवसुली झाल्यानंतर थकबाकीसह एऩपी़एक़मी होण्यास मदत होणार आहे़ याशिवाय जिल्हा परिषदेचे व्यवहार पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, शासकीय- निमशासकीय शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षकांच्या पगारी पूर्ववत जिल्हा बँकेतून करणे, साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी विशेष बैठक बोलावून कर्जवसुलीसाठी प्रयत्न करण्याकामी समन्वयकाची भूमिका बजावण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे घेऊन शेतकरी, शेतमजुरांची बँक पुन्हा उभी करणे गरजेचे आहे़