एमएसटीसी या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कंपनीच्या माध्यमातून हा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये औरंगाबाद येथील जालना रोडवरील सेव्हन हिल परिसरातील जागेचा समावेश आहे. एअर इंडियाच्या पूर्वीच्या बुकिंग ऑफिस आणि स्टाफ क्वार्टर्सचा या मालमत्तेत समावेश आहे. ८ आणि ९ जुलै रोजी ही लिलाव प्रक्रिया होणार आहे. बुकिंग ऑफिससाठी २१.४५ कोटी, तर क्वार्टर्सच्या जागेसाठी ४.६४ कोटी इतकी लिलावाची आधारभूत किंमत ठेवली आहे. दरम्यान, या प्रकरणात सुहास वानखेडे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. सदरील जागेचा बाजारभाव जास्त असताना सिडकोने केलेले जागेचे मूल्यांकन संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
औरंगाबादेतील एअर इंडियाच्या जागेचा होणार लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:02 AM